विक्रीसाठी चालवलेल्या 1.25 कोटींच्या सापाची पोलिसांकडून सुटका

Image Credited – ndtv

मध्यप्रदेशमधील नरसिंहगढ येथे ‘रेड सँड बोआ’ नावाचा साप विकण्यासाठी घेऊन चाललेल्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सापाची किंमत 1.25 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. 5 आरोपींना पकडण्यात आले असून, यातील 3 जण अल्पवयीन आहेत.

पोलिसांनुसार, या गैर विषारी सापाचा वापर  औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि जादूटोणा करण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे. याशिवाय हा साप चांगले नशिब आणि संपत्ती घेऊन येतो असे मानले जाते.

पोलीस अधिकारी कैलास भारद्वाज यांनी सांगितले की, आमच्या खबऱ्याने नरसिंहगढ बस स्टँडवर तीन व्यक्तींना फोनवर बोलताना आणि सापाच्या विक्रीचा व्यवहार करत असल्याचे ऐकले, त्याने त्वरित पोलिसांना माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत साप ताब्यात घेतला व पवन नागर आणि श्याम गुर्जरसह तीन अल्पवयीनना अटक केले. या सापाची किंमत जवळपास 1.25 कोटी असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकशी केल्यावर आरोपींनी सांगितले की, त्यांनी हा साप मध्य प्रदेशमधील सेहूर जिल्ह्यातून आणला असून, ते नरसिंहगढ येथे त्याची विक्री करणार होते. वन्यजीव संरक्षण कायदानुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment