हा आहे जगातील सर्वात लहान ‘अँड्राईड पीसी’

Image Credited – Amarujala

चीनची टेक्नोलॉजी कंपनी ‘बी2गो’ ने आतापर्यंतचा सर्वात लहान अँड्राईड पीसी ‘एक्स96एस’ (वायरलेस डाँगल) लाँच केला आहे. या डिव्हाईसचा आकार च्युईंग गम पॅकच्या आकारा एवढा आहे. हे डिव्हाईस एक एंट्री लेव्हल टिव्ही स्टिक आहे. ज्याचा टिव्ही आणि कॉम्प्युटरला कनेक्ट केले जाऊ शकते. या अँड्राईड पीसीचे वजन 31 ग्रॅम आहे. मात्रे हे डिव्हाईस अद्याप बाजारात उपलब्ध नाही.

कंपनीने या डिव्हाईसला 2 व्हेरिएंटमध्ये चीनच्या बाजारात लाँच केले आहे. यामध्ये 2 जीबी + 16 जीबी आणि 4 जीबी + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. कंपनीने सुरूवातीच्या व्हेरिएंटची किंमत 6,600 रुपये आणि दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 8,899 रुपये ठेवली आहे.

या गॅजेटमध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी माली-जी31 जीपीयूसह क्वॉडकोर एमोलॉजिक एस905वाय5 सीपीयू दिला आहे. या पीसीमध्ये टिव्ही आणि मॉनिटरला कनेक्ट करण्यासाठी फूल साइज यूएसबी पोर्ट देखील दिला आहे.

अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात कंपनीने 5.1 सराउंड आउटपूट दिला आहे. याशिवाय युजर्सला 4के अल्ट्रा एचडी रिजॉल्यूशनसोबत कंटेट मिळेल.

कनेक्टिव्हिटीसाठी यात अँड्रॉईड 8.1, ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सारखे फीचर्स मिळतील. युजर्स डिव्हाईसद्वारे 3डी कँम्पेटिबल टिव्हीत 3डी गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.

Leave a Comment