
जसजसा वेळ बदलतो, तसतसे लोकांचे नशीब देखील बदलत असते. प्रत्येक वर्षी अनेक व्यक्ती आपल्यासमोर यशाचे शिखर गाठतात. गेल्या एक दशकात अनेक भारतीयांनी आपल्या मेहनतीने यशाचे अनेक शिखर पार केले आहेत. राजकारण, खेळ, चित्रपट यासारख्या अनेक क्षेत्रात मागील 10 वर्षात अनेक व्यक्तींनी नाव कमावले आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

नरेंद्र मोदी –
2 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी 2012 पर्यंत केंद्राच्या राजकारणापासून लांब होते. मात्र 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने त्यांना मुख्य चेहरा करत मैदानात उतरवले. त्यानंतर मोदी बहुमताने विजयी झाले. 2019 मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळत ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

विराट कोहली –
विराटने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या 10 वर्षात विराट क्रिकेटमधील नंबर एकचा खेळाडू ठरला आहे. एका दशकात 20 हजारांपेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार देखील आहे.

सलमान खान –
2009 साली आलेल्या वॉटेंड चित्रपटाने सलमानचे करिअर पुन्हा मार्गावर आणले. त्यानंतर मागील दशकात सलमानने दबंग, रेडी, बॉडीगार्ड, किक, एक था टायगर, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

सचिन आणि बिन्नी बन्सल –
सचिन आणि बिन्नी हे ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये या कंपनीचे 77 टक्के शेअर वॉलमार्टला विकण्यात आले. या कंपनीचे भारतीय ई-कॉमर्स बाजारात 39.5 टक्के भागिदारी आहे.

विकास खन्ना –
मागील 1 दशकात विकास खन्ना एक सर्वसाधारण शेफवरून भारतातील नंबर वन शेफ झाले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी देखील व्हाइट हाउसमध्ये त्यांना बोलवले होते. 2011 मध्ये ‘पीपल’ने त्यांचा सेक्सिएस्ट मेन अलाइव यादीत समावेश केला होता. तसेच त्यांचा द हॉटेस्ट शेफ ऑफ अमेरिकाने देखील सन्मानित करण्यात आले होते.

हिमा दास –
आसामच्या एका छोट्याशा गावावरून प्रवास सुरू करणारी हिमा आज भारताची एक स्टार धावपटू आहे. हिमाने एकाच महिन्यात विविध खेळात 5 सुवर्णपदक जिंकत विक्रम रचला होता.

अरविंद केजरीवाल –
आयआयटी खडकपूरचे विद्यार्थी असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथा चमत्कारापेक्षा कमी नाही. 2011 मध्ये भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा देत त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली व त्यानंतर ते न भूतो न भविष्यती अशा बहुमतांनी जिंकून दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

भुवन बाम –
आजच्या पिढीसाठी भुवन बाम एखाद्या सेलिब्रेटी पेक्षा कमी नाही. भुवन भारतातील सर्वात यशस्वी युट्यूबर पैकी एक आहे. युट्यूबर त्याच्या BB Ki Vines चॅनेलला लाखो फॉलोवर्स आहेत.

अरिजीत सिंह –
कुमार सानू, उदित नारायण आणि सोनू निगमनंतर कोणत्याही गायकाने बॉलिवूडवर राज्य केले आहे तर ते नाव आहे अरिजीत सिंहचे. अरिजितने 2009 मध्ये मर्डर 2 चित्रपटातील फिर मोहब्बत या गाण्याने करिअरची सुरूवात केली. मात्र हे गाणे 2011 ला रिलीज झाले. आपल्या आवाजामुळे अरिजीत आज लाखो तरूण-तरूणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे.
रंजन गोगोई –
अयोध्या प्रकरण, तिहेरी तलाक, राफेल करार, आसाम एनआरसी, सीजीआय ऑफिसला आरटीआयच्या कक्षेत आणणे या सारख्या मोठ्या मुद्यांवर ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजन गोगोई यांचे नाव इतिहासात नमूद झाले आहे.