या पठ्ठ्याने बनवली 800 वॉट सोलर पॅनेल असलेली रिक्षा

Image Credited – Bhaskar

हिमाचल प्रदेशच्या मंडी आयआयटीच्या संशोधकांनी 800 वॉटचे सोलर पॅनेल असणारी रिक्षा तयार केला आहे. एकदा चार्ज केल्यावर ही रिक्षा 45 च्या स्पीडवर 200 किमी चालू शकतो. खराब वातावरणा सौरउर्जा न मिळाल्यास वीजने देखील याला चार्ज करता येईल. ही रिक्षा उना जिल्ह्यातील विपन धिमान याने तयार केला आहे. ही रिक्षा बनविण्या मागचा उद्देश ध्वनी आणि वायू प्रदुषणापासून सुटका मिळवणे आणि पर्यावरणाचे रक्षण हा आहे.

विपिनने ऑटो उद्योगाला स्वस्त आणि प्रदुषण विरहित बनविण्यासाठी आयआयटी मंडीसोबर सोलर उर्जावर चालणाऱ्या रिक्षाचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव आयआयटीने स्विकार केला व त्याला आर्थिक मदत केली. त्याला रिक्षा बनविण्यासाठी 2 वर्ष लागली. यासाठी दीड लाख रुपये खर्च आला असून, आता या रिक्षाची किंमत अडीच लाख रुपये आहे.

विपिनला आयआयटी मंडी व्यतरिक्त राज्य सरकारच्या स्टार्टअप योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला एलाउंस देण्यात येत आहे. ही सुविधा एक वर्षापर्यंत त्याला मिळेल. विपिनचे पुढील लक्ष्य हे उनामध्ये ऑटो उद्योग विकसित करणे असून, यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल.

उना जिल्ह्यातील बसोली येथे विपिन धिमानचे वडील ऑटो स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय करतात. आपल्या वडिलांच्या व्यवसायादरम्यानच त्याल गाड्यांची आवड निर्माण झाली. यामुळे त्याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले व आज तो यशाच्या अगदी जवळ आहे.

Leave a Comment