कोनेरू हम्पी बनली भारताची पहिली महिला विश्वविजेती


मॉस्को : शनिवारी रात्री ऐतिहासिक कामगिरीची भारताच्या ३२ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने नोंद केली. मॉस्कोच्या लुझनिक स्टेडियमच्या व्हीआयपी झोनमध्ये तिने चीनच्या २२ वर्षीय लेई तिरंगीला पराभूत केले. कोनेरू हम्पी ही यासह भारताची पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. १२ फेऱ्यांची रॅपिड चॅम्पियनशिप जिंकून तिने हा ऐतिहासिक यशाचा बहुमान पटकावला आहे.

यादरम्यान १२ राऊंडच्या या चॅम्पियनशिपमधील सात फेऱ्यात ३२ वर्षीय हम्पीने शानदार विजयाची नोंद केली. कोनेरू हम्पी ही आता विश्वनाथन आनंदनंतर भारतामधील दुसरी वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू ठरली. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने भारताची पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा इतिहास रचला आहे. यासह तिला या बहुमान आपल्या नावे करता आला. याच स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिका ही १३ व्या स्थानावर राहिली. आताच्या या स्पर्धेतील कोनेरू हम्पीची कामगिरी कौतुकास्पद ठरली. या स्पर्धेच्या सात फेऱ्यामध्ये तिने चुरशीची खेळी करताना अव्वल चालीच्या बळावर विजयाची नोंद केली. हीच लय कायम ठेवल्याने तिला या विक्रमी यशाचा पल्ला गाठता आला आहे.

Leave a Comment