गुगल असिस्टेंटमधील हे खास फीचर्स तुम्हाला नक्कीच माहित नसतील

Image Credited – CNET

आज इंटरनेटवर कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी युजर्स गुगल असिस्टेंटचा वापर करतात. सध्या गुगल असिस्टेंट युजर्सच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर्स या डिव्हाईसवर अॅप स्वरुपात उपलब्ध आहे. युजर्सच्या या कमांडवरून आवडीची गाणी ऐकू शकतात, क्रिकेटचा स्कोर समजू शकतो. मात्र आजही अनेकांना गुगल असिस्टेंटचा वापर करता येत नाही आणि त्याच्या फीचर्सबद्दल माहिती नसते. गुगलच्या अशाच काही खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

गुगल इंटरप्रेटेर मोड –

युजर्स गुगल असिस्टेंच्या या फीचर्सच्या माध्यमातून अशा लोकांशी संवाद साधू शकतील जे त्यांची भाषा बोलत नाही. हे फीचर तुम्हाला भाषांतर करून देईल. हे फीचर सुरू केल्यानंतर युजर्स सहज कोणत्याही भाषेचे भाषांतर करू शकतात. गूगल होम स्पीकर्स, असिस्टेंट इन-बिल्ट स्पीकर्स, स्मार्टफोन आणि टॅबलेट युजर्स हे फीचर वापरू शकतात.

गुगल असिस्टेंट लेंस –

युजर्स गुगल लेंसद्वारे कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवू शकतील. गुगल लेंसचा वापर करण्यासाठी युजर्सला अ‍ॅपमधील लेंसवर क्लिक करावे लागेल आणि फोनच्या कॅमेऱ्याला त्या वस्तूकडे करावे लागेल. त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर काळ्या रंगाचे बिंदू दिसू लागतील. याचा अर्थ हे फीचर वस्तूचे विश्लेषण करत आहे. काही सेंकदानंतर युजर्सला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळेल.

असिस्टेंट तुमच्यासाठी वाचेल बातम्या –

जर युजर्सला गुगल असिस्टेंटकडून बातम्या ऐकायच्या असतील तर त्यांना सॉफ्टवेअरच्या होम बटनवर क्लिक करावे लागेल. आता युजर्सच्या डिव्हाईसवर सर्च बॉक्स उघडेल. येथे युजर्सला गुड मॉर्निंग म्हणून कमांड द्यावी लागेल. यानंतर गुगल असिस्टेंट हवामानापासून ते देशातील ताज्या घडामोडी ऐकवेल.

असिस्टेंटच्या मदतीने उघडा अ‍ॅप्स –

युजर्स या फीचरद्वारे सहज कमांड देऊन फोनमधील अ‍ॅप्स उघडू शकतात. मात्र यासाठी युजर्सला वॉइस एक्सेस अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल. यासाठी युजर्सला फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन वॉइस एक्सेस फीचर सुरू करावे लागेल. त्यानंतर असिस्टेंटमध्ये जाऊन हॅलो गुगल म्हणावे लागेल. अ‍ॅपचे नाव घेऊन कमांड दिल्यानंतर काही सेंकदात अ‍ॅप उघडेल.

Leave a Comment