लष्करप्रमुख बिपिन रावत देशाचे पहिले सीडीएस होणार


नवी दिल्ली : पहिले चीफ डिफेंस स्टाफ म्हणून भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांची नियुक्ती होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. रावत यांच्या नावावर मंत्रिमंडळ समितीने शिक्कामोर्तब केला असून 15 ऑगस्ट रोजी भारतीय तीन सैन्यांचे प्रमुख म्हणून सीडीएस असतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. 31 डिसेंबर रोजी बिपिन रावत सैन्यातून निवृत्त होत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्य सैन्य प्रमुखांप्रमाणेच सीडीएस असतील. सीडीएस प्रोटोकॉलच्या यादीमध्ये सेना प्रमुखांच्यावर असतील.

संरक्षण मंत्रालयाने चीफ ऑफि डिफएंस स्टाफच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 65 वर्षे करण्याच्या नियमात बदल केले आहेत. तीन सैन्यातील कोणत्याही प्रमुखांची नेमणूक केल्यास सैन्य, नौदल आणि भारतीय वायुसेनेच्या सेवा नियमात बदल केला गेला आहे. संरक्षण प्रमुखांच्या सेवानिवृत्तीचे वय कमाल वयाच्या 65 वर्षांपर्यंत वाढवण्यात येईल.

तीन सैन्यांपेक्षा वरचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद आहे. सुरक्षा तज्ञ ही मागणी 1999 च्या कारगिल युद्धापासून करत आहेत. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने देखील कारगिलनंतर सीडीएसला तिन्ही दलांमध्ये चांगले समन्वय स्थापित करण्याची शिफारस केली होती. आपल्या शिफारशीत जीओएमने म्हटले होते की, जर कारगिल युद्धाच्या वेळी अशी यंत्रणा असती तर तिन्ही सैन्य अधिक चांगल्या समन्वयाने रिंगणात उतरले असते आणि नुकसान फारच कमी झाले असते. त्यानंतर आता 20 वर्षानंतर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

चीफ ऑफ डिफेन्ससारखी व्यवस्था अमेरिका, चीन, युनायटेड किंगडम, जपानसह जगातील बर्‍याच देशांमध्ये आहे. ही पदे नॉटो देशांच्या सैन्यामध्ये आहेत. असे म्हटले जाते की, भारताला मर्यादित स्त्रोतांसह विस्तृत जमीन, लांब सीमा, किनारपट्टी आणि राष्ट्रीय सुरक्षा या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकात्मिक संरक्षण प्रणालीसाठी संरक्षण प्रमुख पदाची मोठी आवश्यकता होती.

Leave a Comment