एअरटेल ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री


नवी दिल्ली – भारती एअरटेलने किमान मासिक रिचार्ज प्लॅन महाग केल्यामुळे महिनाभर सेवा सुरू आता ठेवण्यासाठी एअरटेल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एअरटेलच्या ग्राहकांना आतापर्यंत किमान 23 रुपयांचे रिचार्ज करावे लागत होते, पण यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
आता जर तुम्हाला नव्या प्लॅननुसार एअरटेल नेटवर्कसोबत कायम राहायचे असेल तर 45 रुपयांचे किमान रिचार्ज करावा लागणार आहे. याचाच अर्थ ग्राहकाला आता 22 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. 28 दिवसांची या प्लॅनची वैधता असेल. डेटा किंवा कॉलिंगसाठी यामध्ये मिनिटे मिळणार नाहीत. तर, लोकल किंवा एसटीडी कॉलिंगसाठी 2.5 पैसे/सेकंद, व्हिडिओ कॉलिंगवर 5 पैसे/सेकंद, डेटा वापरासाठी 50पैसे/MB चार्ज आकारला जाईल.

प्रत्येक 28 दिवसाला आजपासून कमीत कमी 45 रुपयांचा रिचार्ज करणे ग्राहकांना गरजेचे आहे. तरच सेवा त्यांची सुरू राहणार आहे. एअरटेलचा एखादा ग्राहक जर 45 रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्रीपेड रिचार्ज करीत नसेल तर त्याला सेवा न देण्याचा अधिकार कंपनीला असल्याचे कंपनीने रविवारी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले. मर्यादित सेवांसोबत 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ (ग्रेस पीरियड) ग्राहकांना दिला जाईल.

पण ग्राहकाची सेवा ग्रेस पीरियड संपल्यानंतर संपुष्टात आणली जाईल. रविवारपासून एअरटेलचे नवीन टॅरिफ दर लागू झाले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यातच एअरटेलसह सर्वच आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ प्लानमध्ये 40 ते 50 टक्के वाढ केली आहे.

Leave a Comment