
मॅक्सिको सिटीच्या कारागृहात 2019 मध्ये तब्बल 475 विवाह पार पडले. मॅक्सिकोची राजधानी असलेल्या मॅक्सिको सिटीच्या पेनेटेंचरी (सुधारणागृह) प्रशासनानेने ही माहिती दिली. या सर्व विवाहांना मंजूरी देण्यात आली होती.
पेनिटेंचरी प्रशासनाचे अंडरसेक्रेटरी हेजाएल रुइज ओर्तेगा यांनी सांगितले की, ज्या लोकांना आपले कुटूंब बनवायचे आहे, त्यांना आम्ही अशाप्रकारे मदत करतो.
ते म्हणाले की, 475 लग्नांव्यतरिक्त सिव्हिल रजिस्ट्रीने स्वातंत्र्यापासून वंचित व्यक्तींना अधिकृतरित्या आपल्या मुलांचे कोणतेही शुल्क न आकारता नोंदणीकरण करण्याची संधी दिली.
राजधानीच्या कारागृहात करण्यात आलेल्या विवाह अभियानात जोडप्यांना विना शुल्क विवाह करणे आणि नि-शुल्क विवाह प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले.