2020 मध्ये या घटनांमुळे बदलणार देश आणि जग

Image Credited – AajTak

2019 हे वर्ष संपायला अवघे काही तास बाकी आहेत. यावर्षी जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटले, अयोध्या प्रकरणाचा निर्णय, पंतप्रधान मोदींचा लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय आणि नागरिकत्व कायद्याला विरोध अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. मात्र 2020 या वर्षात देखील अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. ऑलिम्पिक पासून ते राजकारणात अनेक महत्त्वाच्या घटना 2020 साली घडणार आहेत. याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

निर्भयाच्या दोषींना फाशीच्या शिक्षेचा निर्णय –

सर्वांना वाटत होते की 7 वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर 2019 साली निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात येईल. मात्र कायदेशीर प्रक्रियमुळे याला विलंब झाला. मात्र एका दोषीची पुर्नविचार याचिका रद्द केल्याने दोषींना लवकरच फाशी होण्याची शक्यता आहे.

तीन तलाक पिडितांना मिळणार भरपाई –

उत्तर प्रदेशात तीन तलाक पिडित महिलांना नवीन सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यास सुरूवात होईल.

रस्त्यावर धावणार इलेक्ट्रिक कार्स –

वर्ष 2020 देशातील परिवहनासाठी महत्त्वाचे असणार आहे. 2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये विविध कंपन्यांच्या 8 इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. यात वॅगन आर, टाटा नेक्सन, टाटा अल्टरोज, एमजी झेड एस, महिंद्रा केयूव्ही 100, महिंद्रा एक्यूव्ही300, रेनॉल्ट क्विड, किआ सोलचा समावेश आहे.

Image Credited – Amarujala

अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुका –

अमेरिकेत 2020 साली राष्ट्रपती निवडणुका पार पडणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येणार की नाहीत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भारतीयांना भूटानला जाण्यासाठी द्यावे लागेल शुल्क –

आता भूटानला जाण्यासाठी भारतीयांना 500 ते 3500 रुपये प्रत्येक दिवसासाठी द्यावे लागतील. आतापर्यंत भारतीय मोफतमध्ये भूटानला जात असे. मात्र जानेवारी 2020 पासून भारतीय बांग्लादेशी आणि मालदीवच्या पर्यटकांना भूटानमध्ये जाण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

हाँगकाँग लोकशाही समर्थकांची तयारी –

हाँगकाँगमध्ये चीनच्या विरोधात लोकशाही समर्थकांनी 2019 मध्ये जोरदार आवाज उठवला. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सर्वसाधारण सभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Credited – India.com

बिहार आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुका –

देशाची राजधानी दिल्लीत फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडतील. त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडतील.

एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्क लागणार नाही –

वर्ष 2020 मध्ये ऑनलाईन बँकिंग सोपी होईल. ई-बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

10 मोठ्या बँकांचे विलिनिकरण –

एप्रिल 2020 मध्ये 10 मोठ्या बँकांचे 4 बँकांमध्ये विलिनिकरण होईल. यामुळे सरकारी बँकांची संख्या 24 वरून 12 वर येईल. ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँकचे विलिनिकरण पंजाब नॅशनल बँकेत होईल. कॅनडा बँकमध्ये सिंडिकेट बँकचे, इलाहाबाद बँकचे इंडियन बँकेत विलिनिकरण होईल. याशिवाय यूनियन बँक, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेश बँकेचे विलिनिकरण होईल.

Image Credited – Amarujala

ऑलिम्पिक –

वर्ष 2020 मध्ये जापानच्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक –

महिला व पुरूष असे दोन्ही आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडणार आहेत.

धोनी निवृत्त होण्याची शक्यता –

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

Image Credited – Amarujala

इस्त्रोचे मिशन –

चंद्राच्या जवळ पोहचल्यानंतर आता इस्त्रो सुर्याला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. 2020 मध्ये इस्त्रो अनेक सेटेलाईट लाँच करणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे मिशन आदित्य असेल.

नासा मंगळावर शोधणार जीवन –

नासा 2020 मध्ये मार्स रोव्हरला मंगळ ग्रहावर पाठवणार आहे. याद्वारे मंगळावर जीवनाचा शोध घेतला जाईल.

स्पेस पर्यटन सुरू –

2020 मध्ये अंतराळ पर्यटन सुरू होणार आहे. 2020 मध्ये नासा सामान्य लोकांना देखील अंतराळ घेऊन जाण्याची तयारी करत आहे. मात्र येथे एक रात्र थांबण्यासाठी 35 हजार डॉलर खर्चावे लागतील.

Image Credited – Amarujala

महिला बाँड –

बाँडपटातील आगामी चित्रपट ‘नो टाइम टू डाय’चा ट्रेलर आला आहे. यात बाँडची भूमिका डेनिअल क्रेग साकारत असून, सोबत एक महिला दिसत आहे. सांगण्यात येत आहे की क्रेग या सीरिजमध्ये शेवटची भूमिका साकारात आहे. यानंतर बाँडची भूमिका महिला सांभाळेल.

एनपीआरची सुरूवात –

देशात जनगणनेची सुरूवात 2021 मध्ये सुरू होईल. मात्र नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) अपडेटचे काम आसाम सोडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एप्रिल 2020 आणि सप्टेंबर 2020 पर्यंत चालेल.

चीनची कर्जप्रणाली बदलणार –

वर्ष 2020 पासून चीनची बँकिंग कर्ज प्रणाली नियमांमध्ये बदल होणार आहे. ते बाजाराच्या हिशोबाने कार्य करू शकतील.

Image Credited – Amarujala

डीटीएचचा वापर कमी होणार  –

देशात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार सारख्या ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. नवीन वर्षात अनेक चित्रपट, वेब सीरिज या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.

देशात लाँच होणार 5जी स्मार्टफोन –

2020 मध्ये अनेक देशात 5जी इंटरनेट सेवा सुरू होईल. मात्र भारतात यासाठी वाट पाहावी लागेल. मात्र तरी देखील शाओमी, व्हिवो सारख्या कंपन्या 2020 मध्ये भारतात 5जी स्मार्टफोन लाँच करणार आहेत.

Leave a Comment