आयर्लंड पंतप्रधानांची मालवणजवळ मूळगावी भेट


आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर रविवारी त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या मूळगावी भेट देण्यासाठी पोहोचले. वराडकर यांचे मुळगाव महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील वराड हे आहे. २०१७ मध्ये लियो यांनी आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. मुळगावी त्यांचा हा पहिलाच दौरा असून ते खासगी भेटीवर आले आहेत. गावकऱ्यांनी लियो यांचे जोरदार स्वागत केले आणि सुवासिनींनी त्यांना औक्षण केले.

लियो यांचे वडील अशोक वराडकर डॉक्टर होते आणि १९६० च्या दशकात ते ब्रिटनला गेले आणि तेथे स्थायिक झाले होते. लियो म्हणाले आज माझ्या कुटुंबासमवेत मी आजोबांच्या घरी आलो आहे. माझे आईवडील, भाऊ बहिणी, मेहुणे, पत्नी, नातवंडासोबत मी आलोय आणि आमच्या तीन पिढ्या या निमित्ताने एकत्र गावी आल्या. हा क्षण माझ्यासाठी फार आनंदाचा आणि महत्वाचा आहे. लियो यांनी यावेळी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले आणि पुन्हा गावी यायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.

Leave a Comment