विराट अनुष्काचे नवे वर्ष स्वित्झर्लंडमध्ये


टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का सध्या एकत्र सुटी एन्जॉय करत असल्याचे २ फोटो विराटने सोशलमिडीयावर शेअर केले आहेत. विराटने ते कुठे गेलेत याचा खुलासा केलेला नसला तरी विराट अनुष्का स्वित्झर्लंड मधील गास्टाड या ठिकाणी असून तेथे ते नववर्ष साजरे करणार आहेत. विशेष म्हणजे याच ठिकाणी बॉलीवूड सितारेही नवीन वर्षाची सुटी साजरी करत आहेत. त्यात सैफ, करीना, तैमुर आणि करिश्मा कपूर, वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा यांचा समावेश आहे.

विराटने त्याच्या फोटोसोबत क्रिसमस इमोजी टाकल्या आहेत. विराट आणि अनुष्का स्पोर्ट्स वेअरमध्ये दिसत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर लाईक केले आहेत. विराटने मागेच मोठ्या सुटीवर जाताना त्याची बेस्ट कंपॅनियन म्हणून अनुष्काच असणार असे जाहीर केले होते. वेस्ट इंडीजबरोबर टीम इंडिया नुकतीच ती वनडे सिरीज खेळली असून टीम इंडिया ५ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे सिरीज खेळणार आहे. विराटने आयसीसी वर्ल्ड कप नंतर नोव्हेंबर मध्ये सुटी घेतली होती. यंदाच्या वर्षात टीम इंडिया टी २० चे सर्वाधिक सामने खेळणार आहे.

Leave a Comment