नागमण्यासह नागराज पाहायला गर्दी


कर्नाटकातील एका गावात एका शेतात डोक्यावर तेजस्वी नागमणी असलेल्या नागराजाला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर या नागराजाचे फोटो व्हायरल झाले असून काही काळापूर्वी याच जातीचा एक नाग कर्नाटकात पाहण्यात आला होता तेव्हाही लोकांनी त्याला पाहण्यासाठी अशीच गर्दी केल्याची घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार एका शेतकऱ्याचा शेतात कुत्रा सतत कश्याकडे तरी पाहून भुंकत होता तेव्हा शेतकऱ्याने त्या जागी पहिले तेव्हा त्याला कोब्रा जातीचा नाग दिसला आणि त्याच्या डोक्यावर लाल रंगाचा प्रकाश होता. हा काहीतरी चमत्कार असावा असे वाटून या शेतकऱ्याने बाजूच्या लोकांना बोलावले तेव्हा त्यानाही हा प्रकार पाहून आश्चर्य वाटले आणि तेथेच नागाची पूजा सुरु झाली. डोक्यावरचा प्रकाश म्हणजे नागमणी असावा असा तर्क सुरु झाला.

अनेक भारतीय पुराण कथांमध्ये नागमणी असलेल्या नागांचे वर्णन वाचायला मिळते. हे नाग दैवी शक्ती असलेले मानले जातात. ते हवे तेव्हा मनुष्य रूप घेऊ शकतात असाही समज आहे.त्यामुळे हा नाग दैवी असावा या समजुतीने त्याची पूजा केली गेली.

प्राणी तज्ञ आणि सर्पतज्ञाच्या म्हणण्यानुसार ही नागाची एक विशेष जात असून त्याच्या डोक्यावर लाल रंगाची एक रेषा असते. या रेषेवर सूर्यप्रकाश पडला तर ही रेषा चमकते. नागमणी असा काहीही प्रकार नसतो असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment