डायमंडशेप कॅमेरा सेटअपचा विवो एस१ प्रो ४ जानेवारीला येणार


सोर्स, ट्विटर
चीनी स्मार्टफोन कंपनी विवो त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन विवो एस १ प्रो येत्या ४ जानेवारीला भारतात लाँच करत असून त्याचा टीझर ई कॉमर्स कंपनी अमेझोनवर जारी केला गेला आहे. कंपनीने फोन लॉन्चिंगची तारीख ट्विटरवर जाहीर केली आहे. फोनची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही मात्र हा फोन २२००० रुपयांच्या रेंज मध्ये असेल असे अंदाज व्यक्त केले गेले आहेत.

गतवर्षी हा फोन फिलीपिन्समध्ये लाँच केला गेला होता. या फोनची खासियत आहे त्याचा कॅमेरा सेटअप. या फोनचा क्वाड कॅमेरा सेटअप डायमंड शेप मध्यें आहे. वॉटरड्रॉप नॉचसह असलेला हा फोन भारतात पंचहोल डिस्प्लेसह येईल असे समजते. या फोनच्या भारतीय व्हेरीयंट मध्ये ६.३८ इंची फुल एचडीप्लस पंचहोल डिस्प्ले असेल. ८ जीबी पर्यंत रॅम, २५६ जीबी पर्यंत स्टोरेज, फनटच ओएस ९.२ वर आधारित अँड्राईड ९.२, ४८ एमपीचा प्रायमरी, ८ एमपीचा अल्ट्रावाईड, २ एमपीचा डेप्थ तर २ एमपीचा मॅक्रो लेन्स सेन्सर असतील. फ्रंट कॅमेरा ३२ एमपीचा असेल आणि फोनला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल.

Leave a Comment