आथियासोबतचा फोटो शेअर करत राहुलने लिहिला हा डायलॉग


सलमान खानची निर्मिती असलेल्या हिरो चित्रपटाद्वारे अभिनेता सुनिल शेट्टीची लेक आथियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत काही काळापूर्वीच रिलीज झालेल्या ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये दिसली. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करु शकले नाही. पण सोशल मीडियावर आथिया नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचे नाव क्रिकेटर के एल राहुलसोबत जोडले जाते. या दोघांच्या रिलेशनशिपच्या मागच्या काही काळापासून जोरदार सुरू आहेत.

या नात्याबद्दल आथिया किंवा राहुल यापैकी कोणीच उघडपणे बोललेले नाही, पण याला त्यांनी नाकारलेले देखील नाही. या दोघांचे काही दिवसांपूर्वी एका पार्टीनंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता खुद्द राहुलनेच आथियासोबतचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्याने हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. अथियाचे वडील अभिनेता सुनिल शेट्टीनेही या फोटोवर कमेंट केली आहे.

View this post on Instagram

Hello, devi prasad….?

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on


आथियासोबतचा एका फोटो के एल राहुलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने ज्यात फोनचा रिसिव्हर कानाला लावलेला दिसत आहे. तर दुसरीकडे आथिया त्याच्या बाजूला उभी राहून हसत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना राहुलने लिहिले, ‘हॅलो, देवीप्रसाद…?’ राहुलच्या या फोटोवर हार्दिक पांड्याने इमोजीसोबत ‘क्यूटीज’ असे कमेंट केली आहे. तर ‘लाफिंग इमोजी’ सुनिल शेट्टीने पोस्ट केली आहे. या फोटोला राहुलने जे कॅप्शन दिले आहे, जो सुनिल शेट्टीच्या ‘हेरा-फेरी’ मधील डायलॉग आहे.

Leave a Comment