भाजपच्या पोस्टरवर अजित पवारांचा फोटो


ठाणे – माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने कल्याण पूर्वमधील दादासाहेब क्रीडांगणावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो या कार्यक्रमाच्या पोस्टरवर लावण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या राज्यस्तरीय कबड्डी सोहळ्याच्या समारोपासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतार्ह लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवारांचे फोटो लावण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या बॅनरवर भाजपवासी झालेले गणेश नाईक, स्थानिक भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे देखील फोटो लावण्यात आल्याने पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत.

Leave a Comment