‘पाम ब्रेसलेट’


तळहातावरील ब्रेसलेट हा एकच दागिना आहे जो संपूर्ण तळहातावर पसरलेला असतोच पण मागच्याही बाजूला दिसतो. विविध प्रकारचे डिझाईन यात उपलब्ध आहेत. ज्वेलरीमध्ये विविध ट्रेंडस येत असतात सध्याचा नवा ट्रेंड आहे तो तळहातावरील ब्रेसलेटचा.

दिसताना हातात घालण्याच्या ब्रेसलेट सारखेच “पाम ब्रेसलेट’ दिसते. मात्र ते घालताना मनगटाऐवजी तळहातावर घातले जाते. त्यामुळेच याला “पाम ब्रेसलेट’ असे म्हणतात. अर्थातच “पाम ब्रेसलेट’ घातल्याने हात सुंदर दिसतात. पाम ब्रेसलेटमध्ये कफ डिझाईन, वाईड, चेन स्टाईल मध्ये एका पासून चार थरांपर्यंतचे, प्लेन, कडं, ब्रोच विथ रिंग, फुलांचे आकार यापासून स्नेक डिझाईन, फुलपाखरू, पाने, मोर, नववधूसाठी खास युरोपियन, स्लेव व्हिक्‍टोरियन, भौमितिक आकारा, चौकोनी, फंकी इतकी डिझाईन्सची विविधता आहे.

पाम ब्रेसलेट कॅज्युअल पोशाख, पारंपरिक, पाश्‍चिमात्य आणि रोजच्या वापरासाठीच्या पोशाखांवर घालू शकता. ऑफिससाठी साधा आणि एक रंगाचे ब्रेसलेटची निवड करू शकतो. सोनेरी, चंदेरी, ऑक्‍सीडाईज या सर्व रंगात ही ब्रेसलेट रोजही वापरता येतात.

मोर, फुलपाखरू आणि कुंदन आकारातील ब्रेसलेट साडी आणि लेहेंगा यावर घालू शकता तसेच फुलांच्या डिझाईनमध्ये ब्रेसलेट विद रिंग ची निवड करू शकता. पार्टीच्या श्रीमंती लूकसाठी विविध डिझाईन्स, आकार आणि प्रेशियस, सेमी प्रेशियस स्टॉस ब्रेसलेट सुंदर दिसतात.

Leave a Comment