‘गुड न्यूज’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ


मागील आठवड्याच्या शुक्रवारी अभिनेता अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट रिलीज झाला. प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाल्यानंतर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अक्षय कुमारसह इतर कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी गुड न्यूज ठरली आहे.

पहिल्या दिवशी (शुक्रवारी) ‘गुड न्यूज’ने 17.56 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 21.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी जवळ जवळ 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘गुड न्यूज’ने दोन्ही दिवसात 39.34 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते चित्रपट तिसऱ्या दिवशी अजून जास्त कमाई करेल. काही विश्लेषकांनी ‘गुड न्यूज’ रविवारी (आज) 25 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच ‘गुड न्यूज’ला वर्षअखेर (31 डिसेंबर) आणि नव्या वर्षाचा पहिला दिवसाच्या (1 जानेवारी) सुट्ट्यांचा अधिक फायदा मिळेल. त्यामुळे ‘गुड न्यूज’ एका आठवड्यात शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवेल, असेही बोलले जात आहे.

Leave a Comment