“सिक्स पॅक “ मिळविण्याकरिता करा “प्लँक“


आजकालच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांचे “ सिक्स पॅक्स “ प्रेक्षकांना मोहून टाकत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आपलेही सिक्स पॅक असावेत, हे स्वप्न बहुतेक तरुण वर्गाचे असते. या करिता “ प्लँक “ हा व्यायामप्रकार अतिशय प्रभावी ठरतो. हाताची कोपरे आणि पावले, यांच्यावर शरीराचा संपूर्ण भार तोलाण्याला “ प्लँक “ म्हणतात. या मुळे पोटाच्या स्नायूंचे टोनिंग होऊन पोटावरील अतिरिक्त चरबी नाहीशी होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील इतर अवयवांना ही प्लँक मुळे लाभ होतो.

प्लँक मुळे पायांना चांगला आकार मिळण्यास मदत होते. प्लँक केल्याने कंबरेपासून ते पावलांपर्यंत सर्वच स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. हे स्नायू सक्रीय होऊन त्यांच्यावरील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. परिणामी तुमचे पाय बळकट दिसू लागतात. प्लँक चा सर्वात जास्त परिणाम जाणवतो, तो पोटाच्या स्नायूंवर. या व्यायामप्रकारामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येऊन ते सक्रीय होतात. तसेच पोटावरील जमा झालेली अतिरिक्त चरबी देखील नियमित प्लँक केल्याने कमी होते.

नियमित प्लँक केल्याने स्नायूंची लवचिकता वाढते. प्लँक ह्या व्यायामप्रकाराने संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. हाताच्या पंजांवर आणि पावलांवर शरीराचा भार तोलूनही प्लँक करता येतो. या व्यायामाने बाकी शरीराबरोबर हाताचे आणि खांद्यांचे स्नायू व सांधे बळकट होण्यास मदत मिळते. ज्या व्यक्तींना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी प्लँक नियमित, पण थोड्याच वेळाकरिता करावा. एका वेळेला वीस ते तीस सेकंद प्लँक करावे. तीस सेकंद प्लँक करून मग काही क्षणांची विश्रांती घ्यावी, आणि परत वीस सेकंद प्लँक करावा. असे चार ते पाच वेळा केल्याने लाभ होतो.

प्लँक केल्याने शरीराचा मेटाबोलिक रेट वाढून शरीरातील कॅलरीज त्वरेने खर्च केल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. व्यायाम करणे थांबविल्याच्या पुष्कळ वेळानंतर पर्यंत कॅलरीज खर्च होत राहतात, इतका हा व्यायामप्रकार प्रभावी आहे. प्लँक केल्याने शरीराचे पोश्चर सुधारण्यास ही मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment