हे आहेत 2019 मधील सर्वोत्तम डाइट्स

Image Credited – Daily Express

आपले जेवण हे आपल्या आरोग्यमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. लोक जेव्हा आरोग्याप्रती जागृक होतात तेव्हा ते एक निश्चित डाइट पाळू लागतात. ज्यामध्ये काही विशिष्ट आहाराचा समावेश असतो, जे त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. 2019 मध्ये देखील अनेक प्रकाराचे डाइट पाहायला मिळाले. ज्यातील काही आरोग्यासाठी चांगले होते तर काही फायदेशीर ठरले नाहीत. अशाच काही डाइटविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Healthline

एटकिंस डाइट –

आहारतज्ञ रॉबर्ट एटकिंसद्वारे तयार करण्यात आलेला हा डाइट कमी कार्बोहायड्रेड असणारा डाइट आहे. जे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. हा डाइट कार्बोहायड्रेटला सेवनापासून लांब ठेवतो आणि शरीरातील इंसुलिनचा स्तर नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

हा डाइट कॅलरीच्या प्राथमिक ड्राइट्री स्त्रोत आणि भाजीपाल्यांनी नियंत्रित कार्बोहायड्रेडच्या रुपात प्रोटीन आणि चरबीवर अधिक जोर देतो. हा डाइट कमी कालावधीच्या वापरासाठीच लोकप्रिय आहे. अधिक काळासाठी हा डाइट पाळणे शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण यात झाडांच्या स्त्रोतापासून मिळणारे गरजेचे कार्बोहायड्रेट मिळत नाही. यामुळे शरीरात काही पोषक तत्वांची कमी येऊ शकते व फॅटमुळे मिळणाऱ्या अधिक कॅलरीमुळे त्रास होऊ शकतो. 2019 च्या बेस्ट डाइटमध्ये हा 7व्या स्थानावर आहे.

Image Credited – Zuzka Light

झोन डाइट –

झोन डाइटमध्ये संतूलनाचा समावेश आहे. या डाइटमध्ये तुम्हाला प्रत्येक तीन मीलमध्ये 3 सुक्ष्म पोषक तत्वांसोबत 40 टक्के कार्बोहायड्रेट, 30 टक्के फॅट आणि 30 टक्के प्रोटीन घ्यावे लागते. या डाइटमध्ये फायबर आणि फॅटसोबत उच्च गुणवत्तेचे अनरिफाइंड कार्बोहायड्रेड सेवनावर अधिक जोर दिला जातो.

एटकिंस डाइटप्रमाणेच यामध्ये देखील शरीरातील इंसुलिनचा स्तर नियंत्रित करण्याचा समावेश आहे. यामुळे हा डाइट वजन कमी करणे आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हा डाइट 2019 मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

image Credited – Health Essentials – Cleveland Clinic

कीटोजेनिक डाइट –

कीटोजेनिक डाइटमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केले जाते. तर फॅटचे प्रमाण वाढवले जाते. यामुळे शरीर कार्बोहायड्रेटच्या जागी फॅटचा इंधन (उर्जा) म्हणून वापर करू शकेल व शरीरातील फॅट कमी होईल. फीट अथवा मधुमेहांच्या रुग्णांसाठी याचा वापर अनेक दशकांपासून होत आहे. या डायटमध्ये हेल्दी फॅटचा समावेश केला जातो. जसे की, एवोकाडो, नारळ, ऑयली फिश आणि ऑलिव्हचे तेल.

या डाइटचा वापर शरीराच्या संरचनेत बदल आणि वजन कमी करण्यासाठी अनेकजण करतात. हा डाइट सर्वसामान्यांसाठी अधिक योग्य नसतो, कारण कार्बोहायड्रेडचे सेवन कमी केल्याने सुरूवातीला शरीराला कमी उर्जा प्राप्त होते.

Image Credited – Yoga Journal

आयुर्वेदिक डाइट –

जगभरात वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक डाइट खूप लोकप्रिय आहे. आयुर्वेदिक चिकित्सेवर आधारित हे डाइट शरीर आणि मेंदू दोन्हींच्या आरोग्याचे संतूलन कायम ठेवते. याचबरोबर शरीराला उर्जो प्रदान करण्याचे काम करते.

आयुर्वेदिक डाइटमध्ये गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू हे स्वाद असलेले पदार्थ दैनंदिन आहारात समाविष्ट असतात. याउलट जर आपण आपल्या रोजच्या आहारत हे सर्व सहा स्वादांचा समावेश करण्यात अयशस्वी ठरलो तर आपण आरोग्यासाठी नुकसानदायक पदार्थांचे सेवन करत असतो. हे अधिकतर फास्ट फूड आणि प्रोसेड खाद्य पदार्थ असतात. हेच पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात आणि आपल्या शरीराचे संतुलन बिघडवतात. 2014 च्या सर्वोत्तम डाइटमध्ये हा डाइट चौथ्या स्थानावर आहे.

Image Credited – The Economic Times

वेगन डाइट –

शाकाहाराचे मूळ वेगन डाइट (शाकाहारी आहार) सिद्धांतावरून आहे. जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत व अंडी, डेअरीचे पदार्थ व मधाचे देखील सेवन करत नाहीत, ते हा डाइट पाळू शकतात. या डाइटमध्ये केवळ भाजीपाल्याचा समावेश असतो. यामुळे हा डाइट पाळणाऱ्यांमध्ये काही पोषक तत्व कमी असतात. 2019 च्या सर्वोत्तम डाइटमध्ये हा तिसऱ्या स्थानावर आहे.

Image Credited – Everyday Health

मेडेटेरियन डाइट –

हा डाइट प्रसिद्ध व्यक्ती आणि चांगल्या फिटनेस हवे असणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. हा डाइट दक्षिण युरोपियन आहारावर आधारित आहे. या डाइटमध्ये झाड-पालेभाज्यावर आधारित भाज्या, सलाड, ताजी फळे, बियाणे, पनीर, दही यांचा समावेश आहे. याशिवाय मेडेटेरियन समुद्री मासा, ज्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. दैनंदिन जेवणात कमी प्रमाणात दारूसोबतच मासे, कोंबडी आणि मटनाचा समावेश असतो.

नियमित या डाइटच्या माध्यमातून कॅलरीचे सेवन केले तर व्यक्तीच्या आयुष्यात अधिक सुधारणा होते व आजारपण देखील येत नाही. 2019 च्या बेस्ट डाइटमध्ये हा 2व्या स्थानावर आहे.

Image Credited-The Conversation

व्हेजेटिरियन डाइट –

हा डाइट सर्व डाइटमध्ये सर्वात जूना डाइट आहे. भारतीय उपखंडातील लोक याला फॉलो करतात. शाकाहारी लोक लॅक्टो ओवो शाकाहारी आहेत, जे अंडी, दूध, आणि मधासोबतच कोणत्याही प्राण्यावर आधारित भोजनाचा सेवन करत नाहीत.

हा डाइट पर्यावरणाला अनुकूल असून, दैनंदिन जीवनात पाळणे सहज सोपे आहे. कॅलरीचे सेवन योग्य रित्या केल्यास शाकाहाराचे शरीरावर अधिक चांगले फायदे पाहण्यास मिळतात. शाकाहारींचे वजन खूप कमी असते  आणि त्यांना ह्रदयविकाराचा आजारही नसतो. सोबत मांस आणि प्राण्यांच्या उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी अधिक आयुष्य जगतात. 2019 मधील हा सर्वोत्तम डाइट आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment