1 जानेवारीपासून एसबीआय एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलणार

Image Credited – Livemint

ग्राहकांना फसवणुकीपासून रोखण्यासाठी व सुरक्षित बँकिंगसाठी बँका वेळोवेळी सूचना जारी करत असते. आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकने (एसबीआय) ग्राहकांसाठी एक नवीन व्यवस्था सुरू केली आहे. याच्या माध्यमातून ग्राहक फसवणूकीपासून वाचू शकतील. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नवीन नियमाची सुरूवात 1 जानेवारी 2020 पासून होणार आहे.

एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा आणत आहे. ही सेवा देशभरातील एसबीआय एटीएमसाठी लागू होईल.

एसबीआयने ट्विट करत माहिती दिली की, 1 जानेवारी 2020 पासून रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल.

एसबीआयने माहिती दिली की, 10 हजारांपेक्षा अधिक पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल. ग्राहकाने बँकेत दिलेल्या रजिस्टर्ज मोबाईल नंबरवर हा ओटीपी पाठवला जाईल.

जर ग्राहकांनी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर ही सुविधा मिळणार नाही. पैसे काढत असताना एटीएम स्क्रीनवर रक्कमेसोबतच ओटीपी स्क्रीन देखील दिसेल. ग्राहकांना ओटीपी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जातो. यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होतील.

Leave a Comment