चक्क मायन्स 52 डिग्री तापमानात धावले धावपटू

Image Credited – Bhaskar

उत्तर चीनच्या मंगोलिया येथील गेन्हे शहरात 2019 चायना पोल ऑफ कोल्ड मॅरोथॉनमध्ये 1500 धावपटूंनी भाग घेतला होता. या मॅरोथॉनची खास गोष्ट म्हणजे तब्बल मायन्स 52 डिग्री सेल्सियसमध्ये धावपटू धावले. बर्फाच्छादित मैदानात शर्यती दरम्यान धावपटूंच्या चेहरा आणि शरीरावर बर्फाची चादर जमा झाली होती. थंडीपासून वाचण्यासाठी धावपटूंनी जाड कपडे आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता.

आयोजकांनुसार, हा पुर्ण भाग बर्फाच्छादित आहे. चायना कोल्ड पोल मॅरोथॉन दरवर्षी होते.  या वर्षीच्या मॅरोथॉनमध्ये स्थानिक आणि दुसऱ्या देशांच्या लोकांनी देखील भाग घेतला होता.

मॅरोथॉनमध्ये भाग घेतलेल्या सर्व धावपटूंना 40 डिग्रीपर्यंतच्या तापमानात धावण्याचा अनुभव आहे. गेन्हे चीनचे सर्वाधिक थंड शहर आहे. येथील तापमान -58 डिग्रीपर्यंत नोंदवण्यात आलेले आहे.

Leave a Comment