…तरच मिळणार सप्तश्रृंगीच्या गाभाऱ्यात प्रवेश


नाशिक – सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टच्यावतीने महिलांना साडी परिधान करून तर पुरुषांना सोवळे घालूनच सप्तशृंगी मंदिराच्या गाभाऱ्यात आरती व पूजेच्या वेळी प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हा सत्र अतिरिक्त न्यायाधीश गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.

आता देवीच्या साडे तीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील गाभार्‍यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. तसेच गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी आरती आणि पूजेच्या कालावधीत नोंदणी केलेल्या भाविकांनाच परवानगी दिली जाणार आहे. पण पुरुषांनी सोवळे आणि महिलांना साडी नेसूनच गाभाऱ्यात दर्शन घेता येणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. हा निर्णय देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी घेण्यात आल्याचे देवस्थान अध्यक्ष आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी सांगितले. 1 जानेवारी 2020 पासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.

Leave a Comment