भारतात महिलांच्या तुलनेत विजेचा अधिक वापर करतात पुरूष

Image Credited – Bijli Bachao

भारतातील वाढत्या विद्युतीकरणाचा फायदा महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक झाला असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला. एका अभ्यासात सांगण्यात आले आहे की, नवीन भागात वीज पोहल्याने याच्या वापरावर पुरूषांचे वर्चस्व वाढले आहे. हे संशोधन नेचर सस्टेनिबिलिटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. आतापर्यंत समजले जात असे की, विकासशील देशांमध्ये वीजेचा वापर वाढल्यास सर्वसाधारणपणे महिलांना जेवण बनवणे, पाणी भरणे आणि अन्य घरगुती कामांसाठी कमी वेळ लागतो.

हे संशोधन अमेरिकेच्या कार्नेगी मेल्लन युनिवर्सिटीसह अनेक संशोधकांनी केले आहे. या संशोधकांचे म्हणणे आहे की, केवळ एखादी व्यक्ती अथवा सेवेपर्यंत वीज पोहचणे आवश्यक नाही. कारण यात स्थानिक सामाजिक संदर्भ आणि पारिवारिक सत्ता संतुलनाकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

संशोधकांनी आपल्या अभ्यासासाठी दोन वेगवेगळ्या कुटूंबाला काम करण्यास सांगितले. जेणेकरून भारतात कुटूंबाद्वारे होणाऱ्या वीजेचा वापर समजून घेता येईल. आधी वीज असलेल्या कुटूंबातील 30 पेक्षा अधिक महिलांची मुलाकात घेतली. या महिलांनी सांगितले की, घरात कोणते उपकरण वापरले जातात आणि त्याचा वापर कोण करते.

यानंतर तीन वर्गात एक उपकरण वापरण्यासाठी देण्यात आले. या प्रयोगात सर्वाधिक उपकरणाचा वापर हा पुरूषांनी केल्याचे समोर आले.

संशोधकांनी सांगितले की, गरिब कुटुंबामध्ये पंखा आणि बल्बची संख्या अधिक आहे. तर किचनमध्ये त्याचा वापर खूप कमी होतो. महिलांनी सांगितले की, दुसऱ्या ठिकाणी वीज लाईट असली तरी देखील घरातील कामे करण्यास सोपे जाते.

संशोधकांनी सांगितले की, सर्वक्षणात केवळ एक चतृतांश महिलांनी मान्य केले की वीज आल्याने घराशिवाय आपल्या इच्छेने इतर कामे करण्याचे स्वातंत्र्य मिळते.

Leave a Comment