सावधान ! ऑनलाईन जोडीदार शोधणे पडू शकते महागात

Image Credited – Siasat

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. आता सायबर क्रिमिनल्स ऑनलाईन मॅचमेकिंग वेबसाइटला देखील निशाणा बनवत आहेत. जर तुम्ही देखील अशा युजर्स पैकी असाल जे जोडीदार शोधण्यासाठी आणि लग्नासाठी मॅट्रिमोनी वेबसाइट्सचा वापर करतात, तर सावधा रहा.

काही दिवसांपुर्वी पुण्यातील एका महिला इंजिनिअर अशाच घटनेची शिकार झाली. मॅट्रोमोनिअल वेबसाइटवर जोडीदार शोधताना त्यांची ओळख अशाच फसव्या व्यक्तीबरोबर झाली व त्या महिलेला 10 लाखांचे नुकसान झाले. मॅट्रोमिनी स्कॅम्सचे प्रकार वाढले असून, पुरूषांबरोबर महिला देखील या जाळ्यात अडकत आहेत.

मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने आपल्या सायबर-सेफ्टी आणि सायबर सायकर सिक्युरिटीचे ट्विटर हँडल सायबर दोस्तवरून युजर्सला काही सूचना दिल्या आहेत. यात युजर्सला मॅट्रोमोनी वेबसाइट्सवर जोडीदाराचा शोध घेताना काय करावे आणि काय करू नये. याबद्दल सांगितले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, मॅट्रोमोनियल वेबसाइट्सवर रजिस्टर करण्यासाठी नवीन ईमेल आयडीचा वापर करावा. यासोबतच मॅट्रोमोनियल वेबसाइट्सवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यासारख्या खाजगी गोष्टी शेअर करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

सरकारने युजर्सला सूचना दिली आहे की, कोणत्याही मॅट्रोमोनी वेबसाइट्सवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्याविषयी संपुर्ण माहिती जाणून घ्या. यासाठी वेबसाईटचे रिव्ह्यूज वाचावे आणि कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवण्याआधी मित्र आणि कुटूंबाचा सल्ला नक्की घ्या.

मॅट्रोमोनियल वेबसाइट्सद्वारे फ्रॉड करणारे कोणतीही इमर्जेंसी असल्याचे सांगून पैसे खात्यात टाकण्यास सांगतात. तसेच गिफ्ट पाठवले असून त्यासाठी टॅक्स मनी ट्रांसफर करण्यास सांगून फसवणूक करतात.

 

Leave a Comment