‘गुड न्यूज’ बॉक्स ऑफिसवर एका दिवसात बक्कळ कमाई


शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार- करिना कपूर, दिलजित दोसांज- किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गूड न्यूज’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांसह चित्रपटाच्या विश्लेषकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

सलमान खानचा ‘दबंग ३’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर असताना देखील गुड न्यूजने चांगली कमाई केली आहे. सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटाला मागे सारत अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटाने १८ कोटींची कमाई केली आहे. २० डिसेंबर रोजी दबंग ३ चित्रपट रिलीज झाला होता.

याबाबतची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाने १७.५६ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आठवड्याच्या शेवटी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे चित्र आहे.

Leave a Comment