मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला माधुरी दीक्षितने विकला


आपला हरियाणातील पंचकूला येथील बंगला बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिने विकला आहे. प्रॉपर्टी विक्रीबाबतची संपूर्ण प्रक्रिया माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम माधव नेने यांनी पूर्ण केली आहे. माधुरीने मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला विकल्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. हा बंगला ‘क्लीअर ट्रिप डॉट कॉम’चे (ClearTriip.Com) संस्थापक सदस्य अमित तनेजा यांनी खरेदी केला आहे.

हरियाणाच्या पंचकूला एमडीसी सेक्टर 4 मध्ये हा बंगला होता. 3.25 कोटी रुपयांना माधुरीने हा बंगला विकला आहे. 1996 मध्ये हरियाणातील माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून माधुरीला हा बंगला दिला होता. दरम्यान, हा बंगला विक्री करण्याची संपूर्ण प्रक्रिया माधुरीचे पती नेने यांनी पूर्ण केली आहे.

ज्यावेळी हा बंगला माधुरीला अलॉट करण्यात आला होता, त्यावेळी बॉलिवूडमध्ये माधुरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. माधुरीने 90 च्या दशकात एकामागे-एक दमदार चित्रपट केले. याच काळात माधुरीची ‘हम आपके है कौन’, ‘अंजाम’ आणि ‘राजा’ या सारख्या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. माधुरीच्या नावाने पंचकूला येथील हा 310 क्रमांकाचा बंगला ओळखला जात होता. अनेक नागरिक हा बंगला पाहण्यासाठी पाहण्यासाठी उपस्थिती लावत असत. पण, हा बंगला आता माधुरीने विकला आहे.

Leave a Comment