या वैज्ञानिकाला मिळणार 1.3 कोटींची नुकसान भरपाई

Image Credited – The Indian Express

गेल्या एक दशकापासून हेरगिरीच्या आरोपतून निर्दोष सुटलेले इस्त्रोचे माजी वैज्ञानिक नांबी नारायणन यांना अखेर न्याय मिळाला आहे. केरळ सरकार त्यांना नुकसान भरपाई म्हणून 1.3 कोटी रुपये देण्यात तयार झाले आहे. ही रक्कम सर्वोच्च न्यायालयाने 50 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होत्या त्यापेक्षा वेगळी असेल.

हेरगिरीचा आरोप असलेल्या नांबी यांना याचवर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नांबी वर्ष 1994 मध्ये इस्त्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यानचा विकास आणि अंतराळ योजनांसाठी क्रायोजनिक इंजिन बनवण्यासाठी सुरूवातीपासूनच जोडलेले आहेत. ते क्रायोजनिक इंजिन परियोजनचे संचालक होते.

याच काळात त्यांच्यावर मालदीवच्या दोन महिलांसह 4 जणांवर कथितरित्या संरक्षणासंबंधित महत्वपुर्ण कागदपत्रे लीक करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांना कागदपत्रे लीक करण्याच्या आरोपाखाली उपसंचालक डी. शशिकुमारन आणि रशियाच्या अंतराळ संस्थेचे भारतीय प्रतिनिध के. चंद्रशेखर यांच्याबरोबर अटक करण्यात आले होते.

 

Leave a Comment