व्यक्तीला सापडली 12 लाख रुपयांनी भरलेली बॅग, पुढे काय केले बघा

Image Credited – hindustantimes

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी विसरलेली वस्तू पुन्हा मिळतेच असे नाही. मात्र जर्मनीमधील एका 63 वर्षीय व्यक्तीला त्याने एका झाडाखाली विसरलेली बॅग पुन्हा मिळाली आहे. या बॅगेत तब्बल 16 हजार युरोस (जवळपास 12 लाख 77 हजार रुपये) रोख रक्कम होती. ज्या व्यक्तीला ही बॅग सापडली त्याने एकही रुपया न घेता बॅगच्या मालकाला ती बॅग परत दिली. त्यामुळे नक्कीच त्या व्यक्तीचा ख्रिसमस आनंदात गेला असेल.

ख्रिसमसच्या आदल्या रात्री एका 51 वर्षीय व्यक्तीला सेंटर ऑफ वेस्टर्न सिटी येथे ही पैशांनी भरलेली बॅग सापडली. त्यानंतर त्याने लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी लगेच बॅगच्या मालकाचा शोध घेत त्याला त्याची बॅग परत केली. ज्या व्यक्तीने ही बॅग शोधली त्याला बॅगच्या मालकाने बॅग परत केल्याबद्दल फी देखील देण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यक्तीने ख्रिसमसचा दिवस असल्याने फी घेण्यास नकार दिला.

जर्मनीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने हरवलेली वस्तू शोधून परत केल्यास त्या व्यक्तीला वस्तूच्या किंमतीनुसार फी दिली जाते. यानुसार त्या व्यक्तीला 490 युरो (जवळपास 39 हजार रुपये) एवढे बक्षीस मिळाले असते. मात्र त्याने ते पैसे घेण्यास नकार दिला.

Leave a Comment