जगातील एकमेव व्यक्ती ज्याच्या अस्थी चंद्रावर आहेत दफन

Image Credited – Science | HowStuffWorks

जगभरातील अनेक महान वैज्ञानिक आहेत, जे आपल्या कामगिरीमुळे ओळखले जातात. असेच एक वैज्ञानिक होते यूजीन मर्ले शूमेकर. त्यांनी अनेक अंतराळवीरांना प्रशिक्षित केले. 28 एप्रिल 1928 ला जन्म झालेले यूजीन हे 20 व्या शतकातील सर्वात हुशार व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना 1992 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज एच. डब्ल्यू बुशद्वारे विज्ञानाच्या राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

Image Credited – Amarujala

यूजीन यांना एरिजोनामध्ये बॅरिजंर मेटियोर क्रेटर (उल्का पिंडाने बनलेले खड्डा) सारख्या खड्ड्यांचा अभ्यास करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या खगोल भूविज्ञान संशोधन कार्यक्रमाचे ते पहिले संचालक होते. त्यांचे पहिले मिशन यूटा आणि कोलोराडोमध्ये युरेनियमच्या साठ्याचा शोध घेणे हे होते.

Image Credited – Amarujala

यूजीन यांनी आजपासून साडेसहा कोटी वर्षांपुर्वी पृथ्वीवर कधी उल्कापिंड धडकले होते. त्यावेळी 12 किलोमीटरवर पसरलेला एक उल्कापिंड पृथ्वीला धडकला होता. ज्यामुळे केवळ डायनॉसरच नाही तर पृथ्वीवरील 80 टक्के जीव नष्ट झाले होते. ही जागा मॅक्सिकोचे युकाटन द्वीप आहे.

Image Credited – Amarujala

यूजीन यांनी पृथ्वीवर राहून चंद्राचा खूप अभ्यास केला. ते नेहमी अंतराळ यानात चढण्याचे आणि चंद्रावर चालण्याचे स्वप्न बघायचे. मात्र त्यांचे हे स्वप्न पुर्ण करण्याची संधीच मिळाली नाही. एका गंभीर आजाराने त्यांना अंतराळयात्री बनण्यापासून रोखले. मात्र 1997 ला त्यांच्या मृत्यूनंतर नासाने त्यांचे हे स्वप्न काही प्रमाणात पुर्ण केले व त्यांची अस्थींची राख चंद्रावर दफन करण्यात आली. चंद्रावर अस्थींचे दफन होणारे ते एकमेव व्यक्ती आहेत.

यूजीन शूमेकर यांचे 18 जुलै 1997 ला एका कार अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांची पत्नी कॅरोलीन जीन स्पेलमॅन शूमेकर गंभीररित्या जखमी झाल्या. सध्या त्यांचे वय 90 वर्ष आहे.

Leave a Comment