अशी केली होती धीरूभाई अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरूवात

Image Credited – Aajtak

मोठा विचार करा, त्वरित विचार करा, पुढचा विचार करा, कल्पनेवर कोणाचाच एकाधिकार नसतो., हे शब्द आहेत रिलायन्स इंडस्ट्रीचा पाया रचणारे धीरूभाई अंबानी यांचे. आजच्या दिवशी 28 डिसेंबर 1932 ला गुजरातच्या जूनागढ येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे पुर्ण नाव धीरजलाल हीराचंद अंबानी असे होते. आज त्यांच्याद्वारे उभा केलेला उद्योग त्यांचे दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी चालवत आहेत.

धीरूभाई अंबानी यांनी 50 हजार रुपये आणि आपल्या दोन सहाय्यकांबरोबर उद्योगाची सुरूवात केली. आपल्या पहिल्या उद्योगाची सुरूवात त्यांनी 350 वर्ग फुटाची खोली, 1 टेबल, 3 खुर्च्या, दोन सहकारी आणि 1 टेलीफोनसोबत केली होती. वर्ष 2002 ला त्यांचे निधन झाले.

Image Credited – Aajtak

धीरूभाई अंबानी यांनी 16 वर्षांचे असताना 10वीचे शिक्षण पुर्ण केले आणि 17व्या वर्षी पैसे कमावण्यासाठी 1949 ला भाऊ रमणिकलाल यांच्याजवल यमेनला गेले. येथे त्यांनी 200 रुपये प्रति महिना या पगारात गॅस स्टेशनवर अटेंडेट पदावर नोकरी केली.

Image Credited – LatestLY

काही वर्ष नोकरी केल्यानंतर ते भारतात परत आले व माउंट गिरनार येथे भाविकांसाठी भाजी विकू लागले. काही दिवस बाजारावर लक्ष दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, भारतात पोलिस्टरची मागणी सर्वाधिक असून, परदेशात भारतीय मसाल्यांची मागणी अधिक आहे.

Image Credited – Hindi Goodreturns

येथूनच त्यांनी रिलायन्स कॉमर्स कोर्पोरेशनची सुरूवात केली. यातून त्यांनी भारताचे मसाले परदेशात आणि परदेशातील पोलिस्टर भारतात विकण्यास सुरूवात केली. वर्ष 2000 साली ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.

Image Credited – Newstrack

धीरूभाईंनी नंतर आपला व्यापार अधिक वाढवला. ज्यात पेट्रोकेमिकल्स, टेलिकम्यूनिकेशन्स, इंफॉर्मेशन, टेक्नोलॉजी, एनर्जी, रिटेल, कॅपिटल मार्केट, पॉवर इंडस्ट्री इत्यादींमध्ये उद्योग वाढवला.

एका छोट्याशा खोलीपासून रिलायन्स इंडस्ट्री उभी करणाऱ्या धीरूभाई यांनी 6 जुलै 2002 ला जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूवेळी रिलायन्स 62 हजार कोटींची कंपनी होती.

Leave a Comment