लष्कराचा हा ट्रक सैनिकाने मद्यप्राशन केल्यास नाही होणार सुरु

Image Credited – news18

सैन्य वाहतुकी दरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी सैन्याने इंटीग्रेटेड सेफ्टी सिस्टम तयार केली आहे. सैन्याच्या ट्रकमध्ये ही सिस्टम लावल्यानंतर चालक दारू पिऊन आणि सीट बेल्ट न लावता गाडी चालवू शकणार नाही.

ही सिस्टम सैन्याचे कॅप्टन ओंकार काळे आणि त्यांची टीमने तयार केली आहे. ही सिस्टम चालकाच्या दारू पिण्यावर लक्ष ठेवते. चालकाने दारू पिली असल्यास सिस्टम ट्रकला सुरूच करणार नाही.

हे सेफ्टी सिस्टम चालकाने सीट बेल्ट न लावल्यास देखील काम करते. या इंटीग्रेटेड सेफ्टी सिस्टमचा प्रयोग भारतीय सैन्याच्या जबलपूर व्हिकल फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रक्सवर करण्यात आला व हा प्रयोग यशस्वी ठरला. या सिस्टममुळे अपघात कमी होतील.

Leave a Comment