10 वी पास करु शकतात ‘नाबार्ड’मधील या 73 पदांसाठी अर्ज


राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच ‘नाबार्ड’मध्ये ऑफिस अटेंडेंट पदासाठी 73 जागासाठी नोकर भरती सुरु असून ऑफिस अटेंडेंट या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2020 आहे. ग्रॅज्युएट तसेच त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांचा अर्ज या पदासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. ही सुवर्णसंधी फक्त दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आहे.

ऑफिस अटेंडेंट पदासाठी नाबार्ड अंतर्गत घेण्यात येणारी ही पदभरती ग्रुप ‘सी’ दर्जाची असून ही भरती या पदाच्या एकूण 73 जागांसाठी करण्यात येणार आहे. 10 वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. जे उमेदवार दहावी पास झालेले आहेत, असे सर्व उमेदवार या पदासाठी अर्ज भरण्यास पात्र असणार आहेत. यासाठी अर्जदाराचे वय कमीत-कमी 18 वर्ष असले पाहिजे. तसेच 1 डिसेंबर 2019 पर्यंत उमेदवाराचे वय 30 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.

2 टप्प्यात या जागेसाठी निवड प्रक्रिया होईल. पहिल्या टप्प्यात परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांच्या भाषेची चाचणी होईल. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. सर्वात पहिली चाचणी ही 120 गुणांची असणार आहे. यात इंग्लिश, जनरल अवेअरनेस, अंक गणिताशी संबंधित प्रश्न असणार आहेत.

मुख्य परीक्षा देण्यास प्राथमिक चाचणीत उत्तीर्ण होणारे उमेदवार पात्र असतील. 150 गुणांचे प्रश्न मुख्य परीक्षेत विचारले जातील. यात प्राथमिक स्तरावरील प्रश्न, तसेच स्वाभाविक कल, नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य, सामान्य जागृकता, इंग्रजी भाषा याच्याशी संबंधित प्रश्न असतील. यासाठी 150 गुणांच्या परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे.

हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उमेदवार या परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेसाठी उमेदवारांना 450 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय एससी/एसटी/ पीडब्ल्यूडी वर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 50 रुपये असणार आहे. तुम्ही ऑफिस अटेंडेंट पदासाठी www.nabard.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

Leave a Comment