या दिवशी रिलीज होणार आलिया भट्टचा ‘गंगुबाई’


लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथानकावर मागील बऱ्याच दिवसापासून काम सुरू होते. अखेर या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

आलिया भट्ट ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. ती यापूर्वी सलमान खानसोबत ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात दिसणार होती आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळीच करणार होते. पण सलमानने काही कारणास्तव या चित्रपटातून माघार घेतल्यामुळे आलिया भट्ट आता त्यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये भूमिका साकारणार आहे.


याबाबतची अधिकृत माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. पुढच्या वर्षी ११ सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आलियाने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आपल्याला सान्ताक्लॉजने दिलेली भेट असल्याचे म्हटले आहे. गंगुबाई काठियावाडी हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट राहणार आहे.

या चित्रपटाची कथा संजय लीला भन्साळींनीच लिहिली असून त्यांच्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, रणबीर कपूर यांचीही पाहुण्या कलाकाराची भूमिका राहणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, विजय राज आणि विनय पाठक यांचीही काही अशंत: भूमिका पाहायला मिळेल.

Leave a Comment