मॅग १- जगातील सर्वात छोटा लॅपटॉप


काही काळापूर्वी ट्रेंडमध्ये असलेल्या छोट्या स्मार्टफोन आणि कॉम्पॅक्ट गॅजेट्सची क्रेझ ओसरून आता मोठ्या स्क्रीनचा ट्रेंड पुन्हा चलनात आला असताना चीनच्या मॅजिक बेन कंपनीने मॅजिक बेन मॅग १ नावाने जगातील सर्वात छोटा लॅपटॉप सादर केला आहे. या लॅपटॉपचा आकार ए ५ शिटपेक्षा लहान आहे. स्क्रीन ८.९ इंची आहे तर या लॅपटॉपचे वजन फक्त ७०० ग्रॅम आहे.

टच पॅडवाला हा जगातील सर्वात छोटा लॅपटॉप असल्याचे टेकक्रंचच्या अहवालात म्हटले गेले आहे. या लॅपटॉपला तीन फुल साईज युएसबी ३.० पोर्ट्स, टाईप सी कनेक्टर, मायक्रो एसडी कार्ड रीडर, १ ऑडीओ सर्किट व मायक्रो एचडीएमआय पोर्ट दिले गेले आहे. १६ जीबी रॅम, हायएंड इंटेल कोअर एम ३ ८१०० वाय सीपीयू, ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज असून बॅटरी बॅक अप सात तासांचा आहे. टाईप सी कनेक्टरच्या मदतीने कोणत्याही पॉवरबँकवर तो चार्ज करता येतो. या लॅपटॉप ला वेबकॅम दिला गेलेला नाही.

मॅजिक बेन मॅग १ हा अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉप ७९० डॉलर्स म्हणजे ५६ हजार रुपयात उपलब्ध आहे.

Leave a Comment