परदेशात फिरताना या गोष्टीबाबत राहा सावध


सोर्स
परदेशात विशेषतः पाश्चिमात्य देशात पुरुष बायका यांचे वर्तन बिनधास्त असते म्हणजे किस करणे, मिठी मारणे या गोष्टींकडे अश्लील वर्तन या दृष्टीने पहिले जात नाही असा आपला समाज असतो. त्यामुळे अनेकांना आपण परदेशात भटकंतीला चाललोय तर आपणही स्वैरपणे वागले तर काही बिघडणार नाही असे वाटते. पण परदेशात पर्यटक म्हणून जाताना तेथेही सार्वजनिक ठिकाणी वर्तन करताना काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा जेलची हवा खाण्याची वेळ येऊ शकते.

दुबईमध्ये मध्ये वावरताना सार्वजनिक जागी कपलने किस केला तर सरळ तुरुंगात जावे लागते. इतकेच नव्हे तर पोलंड, जर्मनी देशात सार्वजनिक जागी किस करण्यास बंदी आहे. फक्त जोडपी सिरीयस रिलेशनशिप मध्ये असतील तर त्यांना त्यातून सुट मिळते. जेव्हा तुम्ही गर्लफ्रेंड बरोबर डेट किंवा नॉर्मल लंच डिनर साठी जाता तेव्हा अनेकदा बिल शेअर केले जाते. द. कोरियात मात्र बिल शेअर केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण तेथील महिला बिल शेअर करणे त्यांच्यासाठी कमीपणाचे मानतात.


स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी सेक्स किंव तत्सम चाळे केले तर पोलीसांकडून ५९ लाख दंड केला जातो. स्पेन पोलिसांना पर्यटकांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली गेली आहे आणि कुणी सार्वजनिक ठिकाणी ड्रिंक्स घेतली तर तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत.

रशियामध्ये तुम्ही कुणाला फुलांचा गुच्छ देत असाल तर त्यातील फुलांची संख्या विषम असेल याचे भान ठेवा कारण तेथे समसंखेतील फुले अंत्यसंस्कारात वापरण्याची रीत आहे. मिशिगन मध्ये तुमच्या जीन्स किंवा ट्राऊझर्सच्या बाहेर अंडरपँटचा भाग दिसला तर तीन महिने तुरुंगाची हवा खावी लागते. तर व्हर्जिनिया मध्ये तुम्ही पार्टनरला धोका दिलात तर भरभक्कम दंड भरावा लागतो.

Leave a Comment