इशा अंबानीचे हे आहेत खास शौक


देशात किंवा परदेशात श्रीमंत व्यक्तीविषयी चर्चा झाली की त्यात आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचे नाव येतेच. त्यांची कन्या इशा हिचा अजय पिरामल याच्याबरोबर विवाह झाला. हा विवाह सोहळा दशकातील सर्वधिक खर्चाचा विवाह सोहळा ठरला होता. मुकेश अंबानी यांच्या या लाडक्या कन्येचे खास शौक काय आहेत याबद्दल फारशी माहिती बाहेर आलेली नसली तरी इशाला तीन गोष्टींचे विशेष आकर्षण आहे.

त्यातील पहिला शौक आहे तो महागड्या कार्सचा. ईशाकडे किमान १५ महागड्या कार्स आहेत. त्यांची किंमत करोडो रुपयात आहे. तिचा दुसरा शौक आहे महागडे फोन्स. ईशाकडे एक असा फोन आहे ज्याची किंमत १ कोटी पेक्षा जास्त आहेच पण या फोनचे विशेष म्हणजे हा फोन कुणीच हॅक करू शकत नाही असे सांगितले जाते.

ईशाची तिसरी आवड आहे महागडी मेकअप किट्स. असे सांगतात ईशाकडे लाखो रुपये किमतीची मेकअप किट्स आहेत. ईशाच्या मेकअप किट्स कलेक्शनमधून एक अख्खे मेकअप साहित्याचे दुकान निघेल असे समजते.

Leave a Comment