आता या अ‍ॅपद्वारे मिनिटात करा फास्टॅग रिचार्ज

Image Credited – Amarujala

15 डिसेंबरपासून देशभरात फास्टॅग लागू झाले आहे. आता फास्टॅगच्या रिचार्जबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. सरकारने एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे मिनिटात फास्टॅगचे रिचार्ज करता येईल.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार (एनपीसीआय) आता वाहनचालक फास्टॅगला भीम यूपीआयद्वारे रिचार्ज करू शकतात. भीम यूपीआयद्वारे रिचार्ज करून चालक टोल प्लाझावरून सहज प्रवास करू शकतील.

यामुळे आता तुम्हाला फास्टॅगचे रिचार्ज नसल्यामुळे दुप्पट रक्कम मोजावी लागणार नाही. आतापर्यंत फास्टॅगला जारी करणाऱ्या बँकेच्या पोर्टलवर जाऊनच रिचार्ज करता येत असे. जर तुम्ही ऑनलाईन अमेझॉनवरून खरेदी केले असेल तर या सुविधेनंतर तुम्ही अधिकृत फास्टॅग अपवरून देखील रिचार्ज करू शकता.

जर तुमच्याकडे देखील एखाद्या बँकेचे फास्टॅग असेल तर तुम्ही भीम यूपीआयद्वारे रिचार्ज करू शकता. भीम अ‍ॅप लॉग इन केल्यानंतर सेन्ड पर्याय निवडा. त्यानंतर NETC FASTag UPI ID जसे की netc.VehicleNumber@BankUPIHandle लिहा. यामध्ये फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेचे नाव यूपीआय हँडलमध्ये लिहा. उदाहरणार्थ, NETC.UP99TUV2100@axisbank असे. यानंतर रक्कम आणि पिन टाकून ट्रांजेक्शन करू शकता.

सरकारी आकड्यानुसार आतापर्यंत 1.04 कोटी फास्टॅग्सची विक्री झाली असून, दिवसाला सरासरी 1 लाख फास्टॅग घेतले जात आहेत. देशभरात 523 फास्टॅग टोल फ्लाझा असून, त्यांचे दर दिवशी सरासरी कलेक्शन 78.6 कोटी रुपये आहे.

Leave a Comment