जगभरात असे ही शिकवले जातात विचित्र कोर्स

Image Credited – Amarujala

12वी नंतर पुढील शिक्षण पुर्ण करण्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान या चर्चित विषयानंतर आता अनेक कोर्सेस उपलब्ध झालेले आहेत. शाळा-कॉलेजमध्ये अनेक नवनवीन विषय शिकवले जात आहेत. या दशकात भारतात देखील अनेक नवनवीन विषय शिकवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

भूतविद्या –

उत्तर प्रदेशच्या बनारस हिंदू युनिवर्सिटीमध्ये भूतविद्यावरील कोर्स सुरू होत आहे. बीएचयूच्या आयुर्वेद शाखेत हा कोर्स शिकवला जाईल. हा सहा महिन्यांचा कोर्स असून, यामध्ये मानसिक आजार, उपचार आणि मनोचिकित्सेबद्दल सांगितले जाईल. या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

Image Credited – Amarujala

कसे बनाल चांगले पती-पत्नी –

हा एक प्री वेडिंग मॅरेज कोर्स असून, इंडोनेशियाच्या सरकारने याची सुरूवात केली आहे. लग्नाच्या आधी अविवाहित लोक यात भाग घेऊ शकतात. हा कोर्स 3 महिन्यांचा असून, यात चांगले पती-पत्नी कसे बनावे हे शिकवले जाईल.

या कोर्समध्ये लग्नापासून ते प्रजनन आरोग्याविषयी सर्व शिकवले जाईल.

Image Credited – Amarujala

शिकवणे शिकण्याचा कोर्स –

कोणतीही नवीन गोष्ट कशी शिकायची, हे शिकण्यासाठी हे वेगळा कोर्स चालवला जात आहे. या प्रक्रियेला शिकवण्याची क्षमता (Learnability) म्हणतात. लर्नेबिलिटी भविष्य चांगले बनविण्यासाठी चांगले माध्यम आहे. मॅकमास्टर युनिवर्सिटी आणि यूसी सॅन डिगोमध्ये हा कोर्स खूप लोकप्रिय आहे. 2019 मधील जागतिक स्तरावरील टॉ 10 लोकप्रिय कोर्समध्ये हा दुसऱ्या आणि भारतात आठव्या स्थानावर आहे.

Image Credited – Amarujala

ब्यूटी पीजेंट्स-

अमेरिकेच्या ओबर्लिन कॉलेजने हा कोर्स 2011-12 साली सुरू केला होता. हा कोर्स मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स, मिस इंडिया, अमेरिकासह अनेक सौंदर्य स्पर्धांसाठी सुरू करण्यात आला आहे. या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांच्या विजेत्या, त्यांचा इतिहास, संस्कृती, कार्यप्रणाली या गोष्टी शिकवल्या जातात.

Image Credited – Amarujala

गेम ऑफ थ्रोन्सपासून ते हॅरी पॉटर –

अनेक टिव्ही शो, वेब सीरिज आणि चित्रपटांवर कोर्सेस सुरू झाले आहेत. यामध्ये हॅरी पॉटर आणि गेम ऑफ थ्रोन्स लोकप्रिय आहे.

कोलकाताच्या नॅशनल युनिवर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेजमध्ये हॅरी पॉटरवर कोर्स सुरू करण्यात आला आहे. याचा उद्देश हॅरी पॉटरच्या लेखिका जेके रोलिंग्सच्या काल्पनिक जगातील कायदे समजून घेणे हे आहे. जगभरातील अनेक युनिवर्सिटीमध्ये गेम ऑफ थ्रोन्सवरील कोर्स सुरू जाले आहेत.

Image Credited – Amarujala

बुडबुड्यांवर कोर्स –

पाणी अथवा अन्य वस्तूंचे बुडबुडे तुम्ही पाहिले असतीलच. यावर संपुर्ण कोर्स तयार करण्यात आला आहे. कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये कॅव्हिटेशन अँन्ड बबल डायनेमिक्स नावाचा कोर्स आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, बुडबुड्यांच्या मागे जे फिजिक्स आहे. ते कॉम्प्युटिंगसह विज्ञानाच्या अन्य क्षेत्रातील अभ्यासासाठी फायदेशीर आहे.

Leave a Comment