2019 मध्ये या खेळाडूंनी जगभरात फडकवला तिरंगा

Image Credited – Amarujala

वर्ष 2019 मध्ये क्रिकेट व्यतरिक्त इतर भारतीय खेळाडूंनी देखील आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले व जागतिक स्तरावर स्वतःची व देशाची छाप सोडली. जगभरात आपल्या खेळाने देशाचे नाव उंचावणाऱ्या या खेळाडूंविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

गुरूप्रीत –

फीफा विश्वचषकाच्या क्वालिफायरमध्ये आशियाई चॅम्पियन कतारविरुद्ध सामना ड्रॉ खेळत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात        गोलकिपर गुरप्रीत सिंह संधूच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार प्रदर्शन करत सामना ड्रॉ केला. सामन्यात कतारच्या 27 शॉट्सपैकी गुरप्रीतने गोलकिपिंग करताना 11 वेळा गोल वाचवले.

Image Credited – Amarujala

सात्विक-चिराग –

भारताची स्टार बॅटमिंटन पुरूष जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमध्ये सूपर 750 स्तरावरील इव्हेंटमध्ये आपल्या पहिल्या अंतिम सामन्यात पोहचले आणि करिअरमध्ये दुसऱ्यांदा टॉप-10 जागतिक क्रमवारीमध्ये स्थान मिळवले.

भारताची ही स्टार जोडी वर्षाच्या सुरूवातीला थायलंड ओपन खिताब जिंकल्यानंतर बीडब्ल्यूएफ सूपर सीरिज 500 खिताब जिंकणारी पहिली भारतीय जोडी आहे.

Image Credited – Amarujala

सुमित नागल –

भारताचा युवा टेनिस खेळाडू सुमित नागलने यावर्षी यूएस ओपनमध्ये मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवत इतिहास रचला. ग्रँड स्लॅमच्या ड्रॉसाठी क्वालिफाय करणारा तो सर्वात युवा खेळाडू आहे. 25 वर्षीय नागपाल आपल्या पहिल्याच लढतीत 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता रोजर फेडररच्या विरोधात उतरला. मात्र या सामन्यात त्याला पराभव स्विकारावा लागला.

Image Credited – Amarujala

द्युती चंद –

भारताची धावपटू द्युती चंदने जुलैमध्ये 30 व्या समर युनिवर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

Image Credited – Amarujala

दीपक पूनिया –

20 वर्षीय कुस्तीपटू दीपक पुनियाने कुस्तीत आपली छाप सोडली. त्याने ज्युनियर जागतिक चॅम्पियनशीपमध्ये 18 वर्षात प्रथमच भारताला सुवर्णपदक मिळून दिले. याशिवाय जागतिक चॅम्पियनशीपमध्ये देखील रौप्य पदक पटकावले.

Image Credited – Amarujala

मेरी कॉम –

6 वेळाची बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यंदा सुवर्णपदकाची कमाई करण्यापासून चुकली. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मेरी कोमने जागतिक चॅम्पियनशीपमध्ये 6 वेळा विजेतेपदासह एक ऑलिम्पिक कांस्य पदक, पाच आशियाई विजेतेपद, आशियाई खेळात सुवर्ण पदक आणि अनेक आंतरराष्ट्रीय पदक देखील जिंकले आहेत.

Image Credited – Amarujala

नेमबाजी –

भारताने नेमबाजीत शानदार प्रदर्शन करत नवीन विक्रम केले. भारतीय नेमबाजांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 15 कोटा मिळून दिले.

अंगद वीर सिंह बाजवा आणि मैराज अहमद खानच्या स्कीटमध्ये 1-2 ची शानदार आघाडी आणि ऐश्वर्या प्रताप सिंह तोमरच्या 14 व्या आशियाई चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताला नेमबाजीत आतापर्यंत सर्वाधिक 15 ऑलिम्पिक कोटा मिळाले आहेत.

Image Credited – Amarujala

जी साथियान –

टेबल टेनिसच्या जागतिक चॅम्पियनशीपमध्ये गुणासेकरण साथियान एकमेव भारतीय होता ज्याने दुसऱ्या खेळाडूंना जोरदार टक्कर दिली. तो क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही मात्र त्याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले.

तो पहिल्यांदाच टॉप-25 रॅकिंगमध्ये पोहचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आहे.

Image Credited – Amarujala

व्हॉलीबॉल संघ –

भारतीय पुरूष व्हॉलीबॉल संघाने पहिल्यांदा आशिया अंडर-23 च्या अंतिम सामन्यात जागा मिळवली. मात्र अंतिम सामन्यात चीनकडून 3-1 ने पराभव स्विकारावा लागला. आपल्या शानदार कामगिरीने संघ रौप्यपदक जिंकण्यास यशस्वी झाला.

Image Credited – Amarujala

हिमा दास –

भारताची स्टार धावपटू हिमा दासने वेगवेगळ्या खेळात एकाच महिन्यात 6 सुवर्णपदक जिंकले. मात्र अंतिम क्षणी ती ऑलिम्पिकमध्ये क्वॉलिफाय करण्यापासून चूकली.

Leave a Comment