हा आहे या दशकात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज

Image Credited – Indiatimes

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन या दशकात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात (टी20, कसोटी, क्रिकेट) सर्वाधिक 564 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 227 सामन्यात 27.15 च्या सरासरीने हे विकेट घेतले. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत रविंद्र जडेजा 11व्या स्थानावर आहे. त्याने 234 सामन्यात 29.52 च्या सरासरीने 414 विकेट्स घेतले. या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन असून त्याने 180 सामन्यात 536 विकेट्स घेतले. तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्टुअर्ट बोर्डने 213 सामन्यात 528 विकेट्स घेतले.

कसोटी प्रकारात अँडरसन पहिल्या स्थानावर आहे. त्याने 106 सामन्यात 24.30च्या सरासरीने 428 विकेट्स घेतले. दुसऱ्या क्रमांकावर त्याच्याच संघातील ब्रॉड असून त्याने 111 कसोटीत 401 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत पाचव्या स्थानावर अश्विन असून, त्याने 362 खेळाडूंना माघारी धाडले आहे.

एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 162 सामन्यात 28.74 च्या सरासरीने सर्वाधिक 248 विकेट्स घेतले आहेत. या यादीत बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसन असून, त्याने 131 सामन्यात 30.15 च्या सरासरीने 177 विकेट्स घेतले आहेत. या यादीत 5व्या क्रमांकावर भारतीय खेळाडू रविंद्र जडेजा असून, त्याने 145 सामन्यात 171 विकेट्स घेतले. तर 111 सामन्यात 150 विकेट्ससह अश्विन 11 व्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत राशिद खान टॉपवर आहे. त्याने 2015 पासून 45 सामन्यात 84 विकेट्स घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या मलिंगाने 59 सामन्यात 52 विकेट्स घेतले आहेत. भारताचे अश्विन आणि युजवेंद्र चहल 52-52 विकेट्ससह अनुक्रमे 14 आणि 15व्या स्थानावर आहेत. जसप्रीत बुमराह 51 विकेट्ससह 18व्या स्थानावर आहे.

Leave a Comment