भारतासाठी मिसाईल बनवणाऱ्या तरुणाला जपानचे बोलवणे

Image Credited – Amarujala

देशाची सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी क्षेपणास्त्राचे (मिसाइल) मॉडेल तयार करणाऱ्या गौतम चौधरीला आता जापानच्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याला वर्षाला 40 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. ही कंपनी भारतासाठी संरक्षण उपकरण तयार करते.

Image Credited – Amarjujala

उत्तर प्रदेशच्या नौझील येथील जटपूरा गावात राहणारा विद्यार्थी गौतम चौधरी 2015 ते 2019 पासून असे क्षेपणास्त्र मॉडेल तयार करत होता, जे एकसोबत अनेक लक्ष्य भेदू शकेल. आपल्या कुटुंबाची सर्व संपत्ती वापरून त्याने असे क्षेपणास्त्र तयार केले. दावा करण्यात येत आहे की, या मॉडेलवर काम केल्यास हे आतापर्यंतचे सर्वात वेगळे क्षेपणास्त्र असेल. या मॉडेलचे प्रदर्शन मथुराचे डीएम सर्वज्ञराम मिश्र यांच्यासमोर देखील करण्यात आले होते.

Image Credited – Amarjujala

विविध स्तरावरून माहिती गोळा केल्यानंतर मागील आठवड्यात गौतमने आपल्या मॉडेलचे प्रदर्शन इस्त्रोच्या बंगळुरू येथील सेंटरवर केले. येथे मिळालेल्या माहितीनंतर भारतासाठी शस्त्र बनवणाऱ्या कंपनीच्या बंगळुरू येथील कार्यालयाशी संपर्क साधला. या आधावर जापानमध्ये काम करणाऱ्या या कंपनीने गौतमला 40 लाखांच्या वार्षिक पॅकेज देत निवडले.

Image Credited – Amarjujala

जटपुरा येथील निवासी कुंती देवी यांचा मुलगा गौतम अभ्यासाबरोबरच 2015 पासून क्षेपणास्त्र बनवत आहे. 4 वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने हे मॉडेल तयार केले.

Image Credited – Amarjujala

गौतमने दावा केला आहे की, या मॉडेलवर तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र एकसोबत 10 निशाणांवर लक्ष्य साधू शकते. यामध्ये सॉलिड बूस्टर आणि जेट असे दोन इंजिन आहेत. याचे वजन 35 ते 40 किलोग्राम आहे. मुलाचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आई कुंती देवी यांनी वाडवडिलोपार्जित जमीन देखील विकली. सावकाराकडून 4 लाखांचे कर्ज देखील घेतले.

 

Leave a Comment