अमेरिकन सैन्यातील जवानांच्या बूटातून होणार वीज निर्मिती

Image Credited – ViralKnot

अमेरिकने सैन्यातील जवानांना युद्धाच्या मैदानात वीजेसाठी चिंता करण्याची गरज नाही. अमेरिकेन सेना रोबोटिक रिसर्च कंपनी एलएलसीसोबत मिळून सेंसरयुक्त बूटाचे सोल तयार करत आहे. जे पायी चालल्यावर वीज निर्मिती करेल. खास गोष्ट म्हणजे युद्धाच्या मैदानावर जवानांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवले जाईल, कारण यात जीपीएस लावलेले असेल.

एलएलसीला अमेरिकेच्या सरकारने एका करारांतर्गत 16.5 मिलियन डॉलरचे बजेट जारी केले आहे. कंपनी याला तयार करण्यासाठी वॉरलॉक टेक्निकचा वापर करेल. या तंत्राद्वारे जवान चालल्यावर त्यातून वीज निर्मिती होईल व ती त्याल लावलेल्या जनरेट्समध्ये जमा होईल.

या वीजेद्वारे जवान आपल्या आजुबाजूचे उपकरण जसे की, सेटेलाईट फोन, टॉर्चसोबत गॅजेट्स चार्ज करू शकतात. इनसोल टेक्नोलॉजीचा शोध सैन्याच्या सी5आयएसआरने लावला आहे. जे त्यांचे पेटंट उत्पादन आहे.

वैज्ञानिकांनी 2017 मध्ये देखील असा प्रयोग केला होता. मात्र बॅटरीचे वजन अधिक असल्याने ते जवानांसाठी अनुकूल नव्हते. याचप्रकारे 2016 मध्ये अमेरिकन नौदलाने विशेष पँटबद्दल घोषणा केली होती. जी चालल्यावर वीज निर्माण करते. याला पॉवर वॉक असे नाव देण्यात आले होते.

Leave a Comment