ढोलकीच्या तालावर राहुल गांधींनी केले आदिवासी नृत्य

Image Credited – aajtak

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे छत्तीसगढच्या दौऱ्यावर असताना आदिवासींसोबत पारंपारिक नृत्य करताना दिसले. छत्तीसगढच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाच्या उद्घाटनावेळी रायपूरमध्ये त्यांनी आदिवासींसोबत नृत्य केले. यावेळी राहुल गांधी ढोल वाजवताना देखील दिसले.

कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींसोबत राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि लोकसभेचे माजी अध्यक्षा मीरा कुमार देखील होत्या. मंचावर राहुल गांधींसोबत राज्याचे अनेक मोठे काँग्रेस नेते पारंपारिक नृत्यू करत होते. मुख्यमंत्री बघेल यांनी देखील ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. यावेळी राहुल गांधींनी आदिवासींची विशेष बगडी देखील परिधान केली होती.

या आधी देखील गुजरातमध्ये राहुल गांधींनी आदिवासींसोबत नृत्य करण्याचा आनंद घेतला होता. राहुल गांधी रायपुरमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय चालू शकत नाही.

 

Leave a Comment