17 वर्षीय मुलीने चोरले विमान, मात्र… पुढे काय झाले बघाच

Image Credited – Bhaskar

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका 17 वर्षीय मुलीने केलेल्या कृत्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मुलीने विमानतळावर चोरून घुसत एक छोटे विमान चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिला यश आले नाही. तिने हे विमान थेट भितींलाच धडकवले.

कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो योशिमाइट आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. विमानतळ पोलीस प्रमुख ड्यू बेसिन्गर यांनी सांगितले की, 17 वर्षीय मुलाने विमानाचे इंजिन चालू केले आणि तारेच्या कुंपणाला धडकवले.

मुलीने सैन्य क्षेत्रापासून 400 मीटर लांब कुंपणातून घुसखोरी केली होती. मुलीला विमानाची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले आहे.

 

Leave a Comment