या वर्षी रेल्वेअपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही


भारतीय रेल्वेचा इतिहास १६६ वर्षे जुना आहे. विशेष म्हणजे या प्रदीर्घ इतिहासात यंदा प्रथमच चालू वर्षात रेल्वे अपघातात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला गेला आहे. त्यानुसार या वर्षी रेल्वे झिरो पॅसेंजर डेथ ची साक्षीदार बनली आहे.

२०१९-२० साठीची आकडेवारी रेल्वे विभागाने सादर केली आहे. त्यानुसार रेल्वे टक्कर, आग, रेल्वे क्रॉसिंगवरील धडक, रुळावरून रेल्वे घसरणे अश्या अपघातात गेल्या ३८ वर्षाच्या तुलनेत ९५ टक्के घट झाली आहे. २०१७-१८ मध्ये रेल्वेचे ७३ अपघात झाले, २०१८-१९ मध्ये हे प्रमाण ५९ वर आले. २०१४ पासून रेल्वे सेवेमध्ये अनेक सुधारणा सुरु झाल्या आहेत. भारताच्या दुर्गम भागातही रेल्वे सेवा सुरु झाली आहे आणि तेजस सारख्या गाड्यामुळे खासगीकरण सुरवात झाली आहे. रेल्वे विभाग आता दोन विभागात विभागाला जात असून सुरक्षा बल आणि चिकित्सा सेवा असे हे दोन विभाग असतील. रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी होणे आणि एकाही प्रवाशाचा अपघातात मृत्यू न होणे रेल्वे सुरक्षेसाठी मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment