आता मातीशिवाय हवेत उगविणार बटाटे


भारताच्या रोहतक कृषी विभागातील डॉ. सत्येंद्र यादव यांच्या टीमने एक विशेष तंत्र विकसित केले आहे. यामुळे बटाट्याचे पिक घेण्यासाठी आता जमीन किंवा मातीची आवश्यकता संपुष्टात येईल असे समजते. हे बटाटे पिक हवेत अधांतरी घेतले जाते आणि त्याचे उत्पादन पारंपारिक उत्पादनाच्या १२ पट अधिक आहे. यासाठीचे बियाणे तयार करण्याचे काम यशस्वी झाले असून २०२० मध्ये हे बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल असे समजते. या नव्या पद्धतीला एरोपोनिक तंत्रज्ञान असे नाव दिले गेले आहे.

ही लागवड मोठ्या प्लास्टिक अथवा थर्मोकोलच्या डब्यात केली जाते. ऑफ सिझन मध्येही लागवड करता येते. लागवडीचा खर्च कमी आहेच पण उत्पादनही मोठे येते. एका रोपाला ५० ते ६० बटाटे लागतात. त्यावर रोग पडण्याचा धोका नाही. लागवड केल्यावर पोषकतत्वे आणि गरजेनुसार पाणी दिले जाते. त्यामुळे मुळांची दमदार वाढ होते आणि अधिक संखेने बटाटे लागतात. या तंत्रज्ञानासाठी केंद्रीय बटाटे संशोधन संस्था सिमला यांचे सहकार्य घेतले गेले आहे.

Leave a Comment