या बेटावर माणसांपेक्षा मांजरे अधिक


जगात अनेक बेटे आहेत आणि त्यातील काही त्यांच्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिध्द आहेत. जपान मधील एक बेट तेथील मांजरांच्या संख्येसाठी जगात प्रसिद्ध आहे. तेथे माणसांच्या तुलनेत ६ पट अधिक मांजरे आहेत त्यामुळे मुळचे ओशिमा आयलंड नावाचे हे बेट कॅट आयलंड या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

या बेटाचा इतिहास असा की १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध काळात सुमारे ९०० माणसे या बेटावर वस्तीसाठी आली. त्यातील काही मच्छीमार होते तर काही कापडाचे व्यापारी होते. या बेटावर उंदीर होते आणि त्यांचा उपद्रव वाढू लागला होता. उंदीर कापड कुरतडून टाकत त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान होत असे. उंदीर कमी व्हावेत म्हणून या बेटावर मांजरे आणली गेली. त्यांनी उंदरांचा फडशा पाडला पण मांजरांची पिलावळ फारच झपाट्याने वाढली.


या बेटावर अन्य अडचणी होत्याच. एकच शाळा होती, हॉस्पिटल, बाजार नव्हता, बाकी नागरी सुविधा नव्हत्या त्यामुळे कालांतराने येथील लोक स्थलांतर करून शहरात गेले. त्यामुळे माणसांची संख्या रोडावली पण मांजराची वाढतच राहिली. त्यात जपान मध्ये मांजर शुभ मानले जाते. मांजरे येथे मोठ्या संख्येने पाळली जातात, काही ठिकाणी पुजली जातात. मांजरांची देवळे आहेत. त्यामुळे ओशिमा बेटावरील मांजरांचे संरक्षण केले जाते त्यासाठी सरकारने या बेटावर कुत्र्यांना मज्जाव केला असून या बेटावर कुणालाही कुत्रे पाळता येत नाही. या बेटावर कुत्रे येउच दिले जात नाही.

Leave a Comment