बिल गेट्स बनले सिक्रेट सान्ता, दिल्या भक्कम भेटवस्तू


नाताळ सण सर्वांसाठी आनंद घेऊन येतो पण त्यातही ज्याला कुणीच नाही अश्या लोकांसाठी सांताक्लॉज खास भेटवस्तू गुपचूप पाठवितो असाही समज आहे. कुणीही व्यक्ती सिक्रेट सांताक्लॉज बनून दुसरयांवर भेटवस्तूंचा वर्षाव करू शकते आणि त्याच्या चेहऱ्यावर फुललेले समाधानाचे हसू पाहू शकते. सिक्रेट सांताक्लॉज बनण्यासाठी रेडीट नावाच्या वेबसाईटवर स्पर्धा घेतली जाते. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा त्यांनी सिक्रेट सांताक्लॉज बनून एका मुलीला चक्क ३७ किलो वजनाच्या भेटवस्तू पाठविल्या.

ही इतकी भारीभक्कम गिफ्ट नक्की काय असेल आणि ती कुणाला दिली गेली याची उत्सुकता सर्वानाच असणार. तर बिल यांनी ही भेट कोलोराडो मधील शेल्बी नावाच्या मुलीला दिली आहे. यात अनेक वस्तू आहेत. लोकप्रिय पुस्तके, सांताची टोपी, कोडी अश्या या वस्तू असून त्याची माहिती वेबसाईटनेच प्रसिद्ध केली आहे. शेल्बीच्या विवाहाला दहा दिवस राहिले असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला होता. शेल्बीसाठी सिक्रेट सांताक्लॉज बनताना बिल यांनी तिला एक छान पत्र लिहिले आहे. ते म्हणतात, कोणतीही भेटवस्तू आपल्या जीवलगाच्या जाण्याची भरपाई करू शकत नाही. तुझी आई गेली त्याचे मलाही दुःख आहे. तिच्या आठवणीनिमित्त मी अमेरिकन हार्ट असोसिएशनला देणगी दिली आहे.

शेल्बी सांगते माझ्यासाठी नाताळची मिळालेली ही गिफ्ट फार मौल्यवान आहे. त्यासाठी तिने बिलना धन्यवाद दिले आहेत. असे समजते की बिल गेट्स सिक्रेट सांताक्लॉज बनण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती घेतात आणि मगच गिफ्ट देण्याचा निर्णय घेतात.

Leave a Comment