दशकातील सर्वोत्तम 5 खेळाडूमध्ये या भारतीयाचा समावेश

Image Credited – Times of India

विस्डेन या क्रिडा मासिकाने दशकातील सर्वोत्तम 5 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. विस्डेननुसार, विराटने आपल्या प्रतिभेने प्रत्येक आव्हानावर मात केली. त्याने 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर बांगलादेशबरोबर नुकत्याच झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या 5 वर्षात त्याने 63 च्या सरासरीने 5775 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 22शकते आणि 13 अर्धशतके ठोकली आहेत.

2019 मध्ये कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 64.05 च्या सरासरीने 2370 धावा केल्या आहेत. सलग चौथ्यांदा एका वर्षात 2 हजार पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम त्याने केला आहे.

विस्डेनच्या टॉप-5 खेळाडूंमध्ये कोहलीशिवाय ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि महिला क्रिकेटपटू एलिस पेरी देखील आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा देखील समावेस आहे.

विस्डनने म्हटले की, टॉप-5 खेळाडूच्या निवडीसाठी त्यांची सरासरी मुख्य आधार होता. कोहलीची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 50 पेक्षा अधिक सरासरी आहे.

24 डिसेंबरला विस्डेनने दशकातील कसोटी आणि एकदिवसीय संघाची देखील घोषणा केली होती. कोहलीचा या दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे. धोनीला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले आहे. याशिवाय एकदिवसीय संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला होता व रविचंद्रन अश्विनचा कसोटी संघात स्थान मिळाले होते.

कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 84 कसोटी सामन्यात 54.97 च्या सरासरीने 7202 धावा, 242 एकदिवसीय 59.84 सरासरी 11,609 आणि 75 टी20 मध्ये 52.66 च्या सरासरीने 2633 धावा केल्या आहेत. या तिन्ही प्रकारात त्याने आतापर्यंत 100 शतक ठोकले आहेत. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडूलकर (100) आणि रिकी पॉटिंग (71) नंतर तिसरा खेळाडू आहे.

Leave a Comment